मुंबई विमानतळावर 36700000 लाखांचं सोनं जप्त; 3 विमानतळ कर्मचा-यांचा समावेश

मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात सोने पकडले असून या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा समावेश देखील आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 16, 2025, 08:11 AM IST
मुंबई विमानतळावर 36700000 लाखांचं सोनं जप्त; 3 विमानतळ कर्मचा-यांचा समावेश

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 3 कोटी 67 लाखांचे सोने जप्त केले आहे. या ऑपरेशनमध्ये तीन विमानतळाच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. यांच्यासह चार लोकांना अटकर करण्यात आलं आहे. 

विमानतळावरील एका दुकानातील कर्मचारी प्रदीप पवार याचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्याची चौकशी व तपासणी केली. त्यावेळी त्याने पँटमध्ये सोन्याची पेस्ट लपविल्याचे आढळून आले. 

एका प्रवाशाने ती आपल्याला दिल्याचे सांगितले, तसेच ही पेस्ट  मोहम्मद इम्रान नागोरी या व्यक्तीला पोहोचविण्यास सांगितले होते. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी नागोरी याला अटक केली. त्याने चौकशीत अंशू गुप्ता या विमानतळावर काम करणाऱ्या आणखी एका महिला कर्मचाऱ्याने नाव सांगितले. या महिलेचाही तस्करीत समावेश असल्याचे दिसून आल्यावर अधिकाऱ्यांनी तिला देखील अटक केली आहे. 

सूत्रांनी सांगितले की, गुरुवार आणि शुक्रवारी रात्री कस्टम अधिकाऱ्यांनी संशयावरून विमानतळावर ओसीएस ग्रुपच्या प्रदीप पवार या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान, अधिकाऱ्यांना त्याच्याकडून सोन्याच्या धुळीने भरलेले पाउच सापडले. त्याने ते त्याच्या पँटखाली लपवले होते असा आरोप आहे.

चौकशीदरम्यान, त्याने कस्टम अधिकाऱ्यांना सांगितले की त्याला ट्रान्झिट प्रवाशांकडून हा माल मिळाला होता आणि तो तो मोहम्मद इम्रान नागोरी या व्यक्तीला देणार होता. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी नागोरीला अटक केली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागोरीने दुसऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांचे नाव उघड केले ज्यांनी त्याला ट्रान्झिट प्रवाशांकडून तस्करी केलेल्या सोन्याच्या धुळीचे चार पाउच दिले. या कामासाठी कमिशन मिळवणाऱ्या गुप्तालाही नंतर अटक करण्यात आली. ती विमानतळावरील एका रेस्टॉरंटमध्ये सेल्स असोसिएट म्हणून काम करत होती.

नागोरीने चौकशीत संपूर्ण तस्करी ऑपरेशन हाताळणाऱ्या एका व्यक्तीचे नावही सांगितले. कस्टम अधिकारी हँडलरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या एका कारवाईत, कस्टम अधिकाऱ्यांनी गुरुवारी विमानतळावरील एका भोजनालयात काम करणाऱ्या सय्यद मेहताबला अटक केली आणि त्याच्याकडून सोन्याच्या धुळीचे सात पाउच जप्त केल्याचा दावा केला.

पोलिसांनी सांगितले की जप्त केलेल्या सोन्याची किंमत 3.67 कोटी रुपये आहे. चौकशीदरम्यान, त्याने दावा केला की त्याला एका आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट प्रवाशाकडून सोने मिळाले होते आणि विमानतळ परिसरातून तस्करी केलेले सोने बाहेर काढण्यासाठी तो ते दुसऱ्या व्यक्तीला देणार होता.