Mumbai Airport Flights Cancelled due to Israel-Iran Attack : इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य पूर्वेतील इस्त्राइल, अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबई विमानतळावरील वाहतुकीला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार युद्धामुळे मुंबई विमानतळावरील 350 विमाने रद्द करण्यात आली. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. यात विद्यार्थी, खेळाडू, सामान्य नागरिक, पर्यटकांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे.
मुंबई विमानतळावरून रद्द झालेल्या फ्लाइटपैकी 67 विमाने उड्डाण करणार होती, तर 58 विमाने लँडिंग करणार होती. तर दिल्ली विमानतळावरून 60 विमानांचे उड्डाण झाली असून 40 विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले आहे.
मुंबई विमानतळावरील एअर इंडिया कंपनीचे मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणाऱ्या सर्व फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत.
तर इंडिगोनेही अनेक फ्लाइट रद्द केल्या आहेत. ज्यात पश्चिम आशियातील आपली उड्डाणे रद्द केली आहेत. तर मुंबई - लंडन सेवा विस्कळीत झाली आहे.
दिल्ली, मुंबई आणि अमृतसर तसंच लंडन (हीथ्रो आणि गॅटविक), न्यूयॉर्क (जेएफके), नेवार्क, शिकागो (व्हिएन्ना मार्गे), टोरोंटो (व्हिएन्ना मार्गे), फ्रँकफर्ट आणि पॅरिस दरम्यानच्या उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत.
अकासा एअरलाइन्सने घोषणा केली आहे की, अबूधाबी, दोहा, जेद्दाह, कुवेत आणि रियाधला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व उड्डाणे 2 मार्च 2026 सोमवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच एअरलाइन्सने आपल्या ग्राहकांना विनंती केली आहे की, 7 मार्चपर्यंत या शहरांमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या बुकिंगसाठी प्रवासी पूर्ण परतफेड करु शकणार आहेत. प्रवासी त्यांची फ्लाइट पुन्हा शेड्यूल करु शकता, त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुक्ल आकारले जाणार नाही.
एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांच्या पश्चिमेकडील आंतरराष्ट्रीय उड्डाणांने 2 मार्च 2026 सोमवारपर्यंत रद्द केली आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हवाई निर्बंधांमुळे अंदाजे 444 उड्डाणे प्रभावित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि मदत सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमान कंपन्यांसोबत काम करत आहे. या संकटाचा परिणाम केवळ भारतातच नाही तर जगभरात जाणवत आहे. दरम्यान युएई आणि इतर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासांनी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
BOT
(20 ov) 164/7
|
VS |
LES
60(14.1 ov)
|
| Botswana beat Lesotho by 104 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BOT
(20 ov) 102/9
|
VS |
LES
96/8(20 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.