मुंबई : वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून ( Mumbai Building Collapse) झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री  ही दुर्घटना घडली. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकले असण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कल्पना इमारतीसमोर असलेली ही चार मजली रिकामी इमारत शेजारच्या निवासी इमारतीवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दजाचे जवान, ८ फायर वाहने, दोन रेस्क्यू वाहने, दोन जेसीबी, चार डंपर आणि ५० मजूर घटनास्थळी दाखल झाले. तिथे सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असून दोन रहिवाशी जखमी झाले आहेत. 



दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारत गेले काही महिन्यांपासून रिकामीच होती, असे सांगण्यात येत आहे. इमारत नेमकी कोणत्या कारणाने कोसळली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.