Mumbai Train Diversion : पश्चिम रेल्वेच्या 'या' मार्गावर 60 दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

Mumbai Central Railway: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर ट्रॅक दुरुस्तीच्या कामामुळे 60 दिवसांचा ब्लॉक लागू करण्यात आला आहे, परिणामी पश्चिम रेल्वेच्या अनेक गाड्या तात्पुरत्या स्वरूपात दादर रेल्वे स्टेशनकडे वळवण्यात येत आहेत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 7, 2026, 11:04 PM IST
Mumbai Train Diversion : पश्चिम रेल्वेच्या 'या' मार्गावर 60 दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथे ट्रॅक नूतनीकरणाच्या कामामुळे काही गाड्या कमी अंतरावरच थांबतील. मुंबई सेंट्रल स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील संपूर्ण ट्रॅक नूतनीकरणाच्या (CTR) कामामुळे तात्काळ प्रभावाने 60 दिवसांचा ब्लॉक लागू करण्यात येत आहे. याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर होईल. लांबपल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. हा ब्लॉक 7 एप्रिल 2026 पासून सुरु झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॉक तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. मुंबईत आलेल्या एक्सप्रेसचा प्रवास दादर स्थानकात समाप्त करण्यात येणार आहे. पुढील दोन महिने गाड्यांच्या वेळापत्रकात हा बदल राहणार आहे

Add Zee News as a Preferred Source

रेल्वे प्रशासनानुसार, बाधित झालेल्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

गाडी क्रमांक २२९४६ ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल पुढील सूचना मिळेपर्यंत तात्काळ प्रभावाने दादर स्थानकावरच थांबवली जाईल.

गाडी क्रमांक २२२१० हजरत निजामुद्दीन-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, जी ७ एप्रिल २०२६ पासून आपला प्रवास सुरू करणार आहे, पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी आणि रविवारी दादर स्थानकावरच थांबवली जाईल.

गाडी क्रमांक ०९१८६ कानपूर अनवरगंज–मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, ६ एप्रिल २०२६ पासून, पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवारी दादर स्थानकावर थांबवली जाईल.

गाडी क्रमांक ०९०७६ काठगोदाम–मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, ९ एप्रिल २०२६ पासून, पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी दादर स्थानकावरच थांबवली जाईल.

ट्रॅकच्या नूतनीकरणाच्या नावाखाली या लाँग ब्लॉकमुळे, मुंबई सेंट्रलला येणाऱ्या प्रवाशांना आता दादरच्या पुढे लोकल ट्रेन किंवा इतर वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करावा लागेल. यामुळे अतिरिक्त वाहतूक कोंडी आणि गैरसोय होण्याची शक्यता आहे.

प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचे बांधकामाचा परिणाम 

एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम शनिवारी रात्री पूर्ण करण्यात आले. त्या पाडकामामुळे वेळोवेळी घेतलेल्या ब्लॉकचा उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. त्यापाठोपाठ लगेचच मुंबई सेंट्रल स्थानकात ६० दिवसांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला. मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर संपूर्ण रुळ नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी तत्काळ प्रभावाने 60 दिवसांचा ब्लॉक घेण्यात असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सोमवारी जाहीर केले.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More