मरीन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 12 मिनिटांत; प्रजासत्ताकदिनी 'हा' महत्त्वकांक्षी प्रकल्प 100 टक्के खुला होणार

Coastal Road Project: कोस्टल रोड लवकरच पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळं वांद्रे ते मरीन ड्राइव्ह प्रवास 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 19, 2025, 10:07 AM IST
मरीन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 12 मिनिटांत; प्रजासत्ताकदिनी 'हा' महत्त्वकांक्षी प्रकल्प 100 टक्के खुला होणार
Mumbai Coastal Road Final phase between BWSL to Marine Drive to open from Jan 26

Coastal Road Project: प्रजासत्ताक दिनापासून मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड' 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कोस्टल रोडमुळं वांद्रे ते मरीन ड्राइव्ह प्रवास अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांचा 50 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. तसंच, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतूनदेखील सुटका होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईत अनेक नवनवीन प्रकल्पांचे बांधकाम करण्यात येत आहे. मेट्रो, मुंबई लोकल प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. कोस्टल रोड हा पालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. कोस्टल रोडसाठी पालिकेच्या माध्यमातून 14 हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. 2018 पासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून 2023 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळं या प्रकल्पाचा वेळ वाढत गेला आणि प्रकल्पाच्या कामातही अडथळे निर्माण होत होते. मात्र आता कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले असून याची जोडणी वांद्रे सी लिंकला जोडण्यात येणार आहे. 

कोस्टल रोड प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक जोडण्यात आला आहे. यामुळे वांद्रे ते मरीन ड्राइव्ह अशा प्रवासासाठी लागणारा 50 मिनिटांचा कालावधी बारा मिनिटांवर येणार असून इंधनाची 70 टक्के बचत तर वेळेची 34 टक्के बचत होणार आहे. सुरुवातीला वांद्रे ते मरीन ड्राइव्ह अशा 15 किलोमीटरच्या प्रवासाला लागणारा 50 मिनिटांचा कालावधी अवघ्या बारा मिनिटांवर येणार आहे. मुंबईत दररोज शेकडो वाहनांची भर पडत असल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक, मुंबईकरांना करावा लागत आहे. शिवाय वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही भर पडत आहे. त्यामुळं कोस्टल रोड हा सर्वच समस्यांवर मात करणारा आहे. 

असा आहे कोस्टल रोडचा फायदा

कोस्टल रोडला समांतर अशी 7.5 किमी लांबीची फुटपाथ बांधण्यात येणार आहे. प्रियदर्शिनी पार्प ते वरळी सी फेसपर्यंत हा पदपथ असेल. यावर सायकल ट्रकही असेल.
मार्गावर वेगमर्यादा ताशी 80 ते 100 किमी. या ठिकाणी एक 'फुलपाखरू उद्यान, मैदाने, मुलांसाठी घसरगुंडी, सी सॉ फळी, झोके असतील.
भूमिगत पार्पिगमध्ये अमर सन्स येथे 256, महालक्ष्मी मंदिर व हाजी अली 1,200 तर वरळी सी फेस येथे 400 वाहन क्षमता.
बोगदे 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग' तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत.
कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण आणि पोलीस यासारख्या सुरक्षा यंत्रणांशी हे बोगदे जोडलेले असणार आहेत.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More