मुंबई :  मुंबईकरांना सावध करणारी बातमी आहे. शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग (Mumbai Corona Update) वाढलेला आहे. दोन दिवसात चारपटीने कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा एकदा चिंता वाढलीय. गुरुवारी मुंबईत 1 हजार 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (mumbai corona update 18 august 2022 thursday found 1 thousand 201 positive and viral fever increased)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक बाब म्हणजे 30 जून 2022 नंतर गुरूवारी मुंबईत आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सध्या पाच हजार 712 सक्रीय रुग्ण झालेयत. 


साथीच्या आजारांचा विळखा


मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा बसलाय. कोरोनासह शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांतही लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात संपूर्ण जुलै महिन्यात हिवतापाचे 536 रुग्ण आढळले होते. 


ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये हिवतापाचे 412 रुग्ण आढळले. जुलैच्या ३१ दिवसांत डेंग्यूचे 61 रुग्ण आढळले होते.  ऑगस्टमध्ये आतापर्यंत हा आकडा ७३ झाला. 


मुंबईत ऑगस्टमध्ये 14 दिवसांत स्वाइन फ्लूचे 138 रुग्ण आढळले आहेत. यंदा सण मोठ्या उत्साहात आणि एकत्र येऊन साजरे केले जात आहेत.  मात्र, मुंबईकरांनी मास्कचा वापर करावा आणि करोना नियम पाळावेत असं आवाहन करण्यात आलंय.