Pornography Case | कोर्टात रंगणार राज विरूद्ध शिल्पाचा सामना?

पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे (Pornography Case) शिल्पा (Shilpa Shetty) आपल्या पतीवर नाराज असल्याची चर्चा आहे.  

Updated: Sep 16, 2021, 10:33 PM IST
Pornography Case | कोर्टात रंगणार राज विरूद्ध शिल्पाचा सामना?

मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. विशेष म्हणजे या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) साक्षीदार होणारंय. बहुचर्चित पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं राज कुंद्राविरोधात 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. इतकच नाही तर या आरोपपत्रात साक्षीदार म्हणून राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा उल्लेख करण्यात आलाय. या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि शर्लिन चोप्रासह तब्बल 55 साक्षीदारांची नावं आहेत. 1500 पानांच्या चार्जशीटसोबत शिल्पा शेट्टीनं दिलेलं स्टेटमेंटही जोडण्यात आलंय. (Mumbai Crime Branch files 1500 page chargesheet against Raj Kundra in high profile porn film case)
 
राज कुद्रांबाबत काय म्हणाली शिल्पा? 

राज कुंद्रानं  2015 साली विआन इंडस्ट्री लिमिटेड कंपनी सुरू केल्याचं शिल्पानं म्हंटलंय. 2015 ते 2020 पर्यंत शिल्पा कंपनीची संचालक होती. या कंपनीत तिची 24.50 % भागिदारी होती. खासगी कारणांमुळे आपण संचालकपदाचा राजीनामा दिला असं शिल्पाने म्हंटलंय. हॉटशॉट्स आणि बॉलिफेम संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नाही. तसंच राज पोर्नोग्राफीचा धंदा करत असल्याचंही माहिती नाही असंही तिने म्हंटलंय. विशेष म्हणजे कामात व्यस्त असल्यानं पती काय करतो हे माहिती नाही असा जबाबही शिल्पाने दिलाय. 

पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा आपल्या पतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. जबाब नोंदवताना तिला अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर तिनं नव-याची कानउघडणीही केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शिल्पाची साक्ष महत्वाची मानली जातेय.