Mumbai Crime News: मुंबईतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. मालाड येथील ट्रान्सजेंडर गँगकडून महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर नंतर या तरुणावर जबरदस्ती लिंगबदल शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणाने केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमध्ये तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्याच्यावर जबरदस्तीने जेंडर सर्जरी करण्यात आली. यासाठी या तरुणाला सतत ब्लॅकमेलदेखील करण्यात आल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव आणत व मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा संबंधित तरुणाने केला आहे.
तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबरला आरोपींनी तरुणाला सूरतच्या रुग्णालयात नेले. तिथे त्याची इच्छा नसतानाही त्याच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया करम्यात आली. तसंच, शस्त्रक्रियेनंतर त्याला भिक्षा मागण्यास भाग पाडले, त्याच्याकडून पैसे उकळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तसंच, त्यांचं ऐकलं नाही तर सातत्याने धमक्यादेखील देण्यात आल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. अखेर 4 नोव्हेंबरला तिथून पळ काढत स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली.
पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून मालवणी पोलिसांनी अपहरण, ब्लॅकमेल, जबरदस्ती आणि वैद्यकीय अत्याचारासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून रुग्णालय रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वाशिम शहरातील लोणसूने नगर परिसरात रेल्वे पटरीजवळ 27 वर्षीय अभिषेक मानवतकर याचा मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.तसेच अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.पोलिस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून लवकरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
उत्तर: मालाड परिसरात ट्रान्सजेंडर गँगकडून एका महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करण्यात आले आणि त्याच्यावर जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया (Gender Surgery) केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणाने केला आहे.
उत्तर: आरोपींनी तरुणाला सतत ब्लॅकमेल केले, मारहाण केली आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला.
उत्तर: नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचा दावा पीडित तरुणाने केला आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.