Mumbai Crime News : महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर बनल्याचे दिसत आहे. पुण्यात काम करणाऱ्या IT इंजिनीयर तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार झाला आहे. चार जणांनी या तरुणीवर अत्याचार केल्याचे समजते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चारही आरोपी फरार असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
तमीम हरसल्ला खान असे या प्रकरणातील प्रमुख आोरपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही मूळची कर्नाटकची आहे. ती पुण्यातील एका कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून नोकरी करते. पीडितेची तमीम हरसल्ला खान याच्याशी काही वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात नेहमी बोलणे व्हायचे. तमीम हरसल्ला खान याने पीडितेला मुंबईत भेटायला बोलावले.
ठरल्याप्रमाणे पीडित तरुणी तमीम हरसल्ला खान याला भेटण्यासाठी मुंबईत आली. मात्र, तिच्यासह अत्यंत भयानक प्रकार घडला. तमीम हरसल्ला खान आणि त्याच्या 3 मित्रांनी पीडित तरुणीला कोल्डड्रींकमधुन गुंगीचे औषध दिले. यानंतर आरोपींनी तिला कांदिवली येथील एका हॉटेल मध्ये नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी कारमध्येही लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितीने पोलिस तक्रारीत म्हंटले आहे.
आरोपींनी पीडित तरुणीचे अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 30 लाख रुपये आणि दोन आयफोन उकळल्याचा प्रकार ही समोर आला.याप्रकरणी पुणे पोलिसांनी तमीम हरसल्ला खान आणि अन्य तीन मित्र अशा चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अत्याचाराची घटना मुंबईत घडल्याने पुणे पोलिसांनी हे प्रकरण कांदिवली पोलीस स्टेशनकडे वर्ग केले आहे.