Mumbai Local Train New Rule: वातानुकूलित लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना आता पासचे ओळखपत्रही तिकीट तपासनीसांना दाखवावे लागणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचे बनावट तिकीट-पास तयार करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई तीव्र केली आहे. यूटीएस अॅपमधीलच ऑनलाइन तिकीट आणि पास ग्राह्य धरावा आणि ऑफलाइन पद्धतीने काढलेल्या पाससोबत ओळखपत्राची तपासणी सक्तीने करावी, अशा सूचना महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बनावट तिकीट-पासचा आढावा घेण्यासाठी महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेतली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बाजारात उपलब्ध असलेल्या एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून वातानुकूलित लोकलचा बनावट पास तयार केल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य रेल्वेवरील तीन आणि पश्चिम रेल्वेवरील दोन प्रकरणांत विविध रेल्वे पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑफलाइन पद्धतीने पास काढण्यासाठी रेल्वेकडून अधिकृत ओळखपत्र देण्यात येते. त्याचा आधार घेऊन विशेषांकाचा समावेश पासमध्ये केला जातो. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीट तपासनीसांनी पाससह ओळखपत्राची तपासणीही करावी. भारतीय रेल्वेचे अधिकृत यूटीएस अॅपमध्ये दिसणारे तिकीट आणि पास ऑनलाइन वैध तिकीट-पास म्हणून ग्राह्य धरावे. अन्य कोणत्याही माध्यमांमध्ये दाखवण्यात येणारे ऑनलाइन पास ग्राह्य धरू नयेत, अशा स्पष्ट सूचना टीसींना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष तिकीटासोबत ओळखपत्र नसेल तर तिकीट आसूनही दंड आकारण्यात येईल. तसेच केवळ यूटीएस अॅपवरील तिकीटच अधिकृत ऑनलाइन तिकीट मानलं जाईल.
रेल्वे कायद्यानुसार विनातिकी प्रवाशांसाठी 500 रुपये दंड म्हणून रक्कम भरावी लागते. मात्र बनावट तिकीट वापरणे हे रेल्वेची फसवणूक करण्यासारखे प्रकरण आहे. अशा गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 (2), 336 (3) आणि (4), 340 (1) आणि (2), 3 (5) नुसार कमाल सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. यामुळे दाखल गुन्ह्यांत तातडीने कारवाई पूर्ण करावी, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी मुंबई रेल्वे पोलिसांशी अधिक समन्वय साधावा, अशा सूचनाही महाव्यवस्थापक गुप्ता यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
डिसेंबर 2025 च्या सुरुवातीला: मुंबईच्या सेंट्रल स्थानकावर रेल्वेने तीन प्रवाशांना एसी लोकल ट्रेनमध्ये एआय जनरेटेड बनावट युटीएस पाससह पकडले. टीटीईने एक प्रश्न विचारून किंवा पासच्या तपशीलात फरक ओळखून हे उघड केले. या प्रवाशांविरुद्ध एफआयआर दाखल झाली आहे.
कल्याण स्टेशनवर: एका महिला बँक सेल्स मॅनेजरला नकली एसी लोकल पाससह पकडले. पास गूगल क्रोममध्ये उघडलेला होता आणि क्यूआर कोड नव्हता, ज्यामुळे संशय आला.
दुसरी घटना: एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला युटीएसद्वारे बनावट एसी लोकल तिकिटासह अटक झाली. हे प्रकरण मध्य रेल्वेत घडले.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.