)
Mumbai News Today: मुंबई महानगर परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास निगम (एमआरव्हीसी) ने एमयूटीपी 3अंतर्गंत 551 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. मात्र तरीही दरवर्षी 1000 मृत्यू अतिक्रमणामुळं होत आहेत. एमयूटीपी 3 चे काम सप्टेंबर 98 टक्क्यांपर्यंत झालं असून ज्यात 27 एफओबी, 2 एफओबी एक्सटेंशन, 2 लिंक वेस 1 होम प्लॅटफॉर्म, सबवे आणि नाहूर-मुलुंडदरम्यान कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर करण्यात आले आहे. मात्र तरीही परिस्थिती काही बदलली नाही. अतिक्रमणाचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ही प्रकरणे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळं लोकलचे वेळापत्रकदेखील बिघडले आहे.
अधिकृत आकड्यांनुसार, 2014 ते 2024पर्यंत म्हणजेच 10 वर्षात 15,626 जणांनी जीव गमावला आहे. 2020मध्ये 730 लोकांनी प्राण गमावला आहे. 2021-24 या कालावधीत प्रतिवर्ष 1000 ते 1200 लोकांनी ट्रेसपासिंग करताना जीव गमावला आहे. आम्ही अतिक्रमण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एमयूटीपी 3 अंतर्गत बरेच काम झाले आहे, ज्यामुळे अतिक्रमण कमी झाले आहे. पण, ही समस्या पूर्णपणे थांबलेली नाही. भविष्यात, शून्य मृत्यू मोहिमेअंतर्गत अधिक काम केले जाईल. आम्हाला आशा आहे की पुढील पाच वर्षांत परिस्थिती बदलेल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
एमआरवीसीने अतिक्रमण रोखण्यासाठी आत्तापर्यंत 34 मिड सेक्शन लोकेशनवर काम केले आहे. मात्र आता एफओबी, आरओबी आणि स्कायवॉकऐवजी सबवे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आजच्या काळात एफओबीचा वापर करणे लोक टाळतात. मीड सेक्शनमध्ये एक्सक्लेटरदेखील नसतो कारण जागेची समस्या असते. त्यामुळं अडीच ते तीन मीटरपर्यंतचा सबवे बांधण्याची योजना बनवत आहेत. जेणेकरुन लोक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर किंवा दुसऱ्या बाजूला पायऱ्यांच्या मदतीने ये-जा करु शकतील. हे सबवे वॉटर टाइट असतील जेणेकरुन पावसात त्रास वाढणार नाही.
एमआरव्हीसीचे एमडी विलास वाडेकर म्हणाले की, मध्य रेल्वेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तीस नवीन ठिकाणे ओळखण्यात आली आहेत. आम्ही तीन महिन्यांपासून नवीन, आधुनिक सबवे डिझाइन विकसित करण्यासाठी काम करत आहोत. काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हा फक्त पादचाऱ्यांसाठीचा सबवे असेल. रुळांखालील सबवे वॉटरप्रूफ असेल, ज्यामुळे पावसाळी वाहतुकीची समस्या होणार नाही. लवकरच मध्य रेल्वेला प्रस्ताव पाठवला जाईल. मंजूर झाल्यानंतर, रेल्वे निधीच्या माध्यमातून हा प्रकल्प केला जाईल.
- एमयूटीपी 3 अंतर्गत अतिक्रमण रोखण्यासाठी 551 कोटी रुपये खर्च
- स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत अनेक कामेही करण्यात आली
- 2014 पूर्वीही 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता.