)
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील दहा स्थानकांचा ताबा लवकरच मध्य रेल्वेकडे देण्यात येण्याची शक्यता आहे. सिडको आणि रेल्वे प्रशासनात या संदर्भात चर्चा सुरू असूव लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. 25 वर्षांपूर्वी सिडकोने ही स्थानके उभारली होती मात्र या स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबतच्या जबाबदाऱ्या या वरुन दोन्ही संस्थांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, स्थानकांची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण झाल्यानंतरच ती नव्या स्वरूपात स्वीकारली जातील.
वाशी-पनवेल हार्बर मार्गावर दररोज सुमारे 12-14 लाख प्रवासी प्रवास करतात. महत्त्वाच्या स्थानकांमध्ये हार्बर मार्गावरील बेलापूर, खारघर, जुईनगर, सानपाडा आणि ट्रान्स-हार्बरवरील घणसोली, ऐरोली, रबाळे आणि इतर स्थानके समाविष्ट आहेत. आता या स्थानकांची जशीच्या तशी जबाबदारी घेण्यास सिडकोकडून रेल्वेला सांगण्यात आले आहे. परंतु, रेल्वे स्थानकात बांधलेल्या इमारतींचा समावेश आहे ज्या 20-25 वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे या इमारतींची आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची करून ती नव्याने बांधलेल्या हस्तांतरित करण्याचे सांगण्यात आले.
वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल.मध्य रेल्वेकडून स्थानके ताब्यात घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. चर्चेअंती या स्थानकांचा ताबा घेण्यात येणार आहे.
वाशी-पनवेल आणि ठाणे-तुर्भे-सानपाडा मार्गावरील प्रवासासाठी प्रवाशांकडून नेहमीच्या तिकिटांबरोबरच अतिरिक्त अधिभार आकारला जातो. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिडकोला दरमहा सरासरी 5 कोटी रुपये अधिभार दिला जातो. एप्रिलपासून आतापर्यंतच 25 कोटी रुपयांहून अधिक रक्कम सिडकोकडे जमा करण्यात आली आहे. तरीदेखील सिडकोकडून स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार कायम आहे. या स्थानकांची सध्याची अवस्था दयनीय आहे. प्लॅटफॉर्मवरील फरशी तुटलेल्या आहेत. भुयारी मार्ग आणि वायूविजनची स्थिती चांगली नाही. तर, प्रकाश आणि वीज व्यवस्थाही अपुरी आहे. त्यामुळे रेल्वेने स्थानके ताब्यात घेतल्यास त्यांची देखभाल आणि सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
उत्तर: वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील दहा स्थानके हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. यामध्ये वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल ही स्थानके समाविष्ट आहेत. तसेच, ट्रान्स-हार्बर मार्गावरील घणसोली, ऐरोली, रबाळे यांसारखी स्थानकेही महत्त्वाची आहेत.
उत्तर: सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल. स्थानकांची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण झाल्यानंतरच मध्य रेल्वे ती नव्या स्वरूपात स्वीकारेल. २०-२५ वर्षे जुन्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करून हस्तांतर केले-जाईल.
उत्तर: २५ वर्षांपूर्वी सिडकोने ही स्थानके उभारली होती, पण देखभाल आणि दुरुस्तीच्या जबाबदाऱ्यांवर दोन्ही संस्थांमध्ये मतभेद आहेत. सिडकोकडून जबाबदारी घेण्यास सांगितले असले तरी, रेल्वेने दुरुस्तीनंतरच ताबा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानकांची चांगली देखभाल होईल.