Mahapalika Election 2026: महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मुंबई पोलीसांनी जय्यत तयारी केली आहे. धार्मिक आणि इतर मुद्द्यांवर संवेदनशील मतदान केंद्रे नसली तर खुल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत, संपूर्ण मुंबईत 30 हजार पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात ठेवण्यात येणार असून, एसआरपीएफ, क्यूआरटीसह इतर तुकड्यांची अतिरिक्त फौज असेल, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली.
मुंबईमध्ये मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार करण्याचे धाडस कुणी करू नये, यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांमार्फत पथसंचलन करण्यात आले. समाजकंटक तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्यात आली आहे. मतदानादिवशी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दहशतवादविरोधी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, 15 तारखेच्या निवडणुकीत कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. मतदानादिवशी कोणतीही बेकायदेशीर घटना घडू नये, कायद्याची सुव्यवस्था राखली जावी यासाठी जमावबंदीचे आदेश जारी केले गेले आहेत. तसेच निवडणुका जाहीर झाल्यापासूनच सुरक्षा आयोगाकडून विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. पोलीसांकडून 'ऑपरेशन ऑल आऊट' मोहीम राबवली जात आहे. तसेच रेकॉर्डवरील, फरारी आरोपींची धरपकड केली जात आहे.
निवडणुका जाहीर झाल्यापासूनच राज्यात या महापालिका निवडणुकींची रणधुमाळी पहायला मिळत आहे. राज्यातील सर्व लहान-मोठे पक्ष प्रचारासाठी कंबर कसून मैदानात उतले होते. दरम्यान, काल 13 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रचाराचे भोंगे थंडावले. अनेक पक्ष अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जोमाने प्रचार करत होते. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतरही निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी आणखी काही वेळ मिळाला. आता निवडणुकींसाठीच्या मतदानासाठी अवघे काहीच तास उरले आहेत. दरम्यान या काळात अनेक अशा राजकीय घटना घडल्या ज्यामुळे निवडणुका आणखीन चुरशीच्या झाल्या आहेत.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
IND-A
(20 ov) 197/8
|
VS |
NAM
67(12.1 ov)
|
| India A beat Namibia by 130 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
(20 ov) 193/7
|
VS |
UAE
81(18.2 ov)
|
| Italy beat United Arab Emirates by 112 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 208/7
|
VS |
USA
201/8(20 ov)
|
| New Zealand beat USA by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.