मुंबई: मुंबईकरांनो आज सुट्टी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर इकडे लक्ष द्या. शहरात प्रवास करण्याचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहून घ्या. कारण, मुंबई रेल्वे आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेत आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या मार्गावर किती काळ आणि किती वाजलेपासून मेगाब्लॉक सुरू होत आहे. तसेच, तो केव्हा संपत आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते ३.१५ या वेळेत अभियांत्रिकी काम चालणार आहे. त्यामुळे सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन जलद लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुठील सर्व जलद लोकल मुलुंडपासून जलद मार्गावर चालविण्यात येतील.


हार्बर रेल्वे


हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी-वांद्रे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.११ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक आहे. त्यामुळे विरार, वसई ते बोरीवलीपर्यंत दोन्ही मार्गांवर लोकल धीम्या मार्गावर चालतील.