मुंबईच्या पोटातून धावणारी पहिली मेट्रो! आजपासून 11 स्थानके सेवेत; तिकीटदर, वेळापत्रक अन्... सगळं जाणून घ्या

Mumbai Metro 3: आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून गुरुवारपासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 8, 2025, 07:20 AM IST
मुंबईच्या पोटातून धावणारी पहिली मेट्रो! आजपासून 11 स्थानके सेवेत; तिकीटदर, वेळापत्रक अन्... सगळं जाणून घ्या
Mumbai Metro 3 Know 6 Entry Points From Cuffe Parade and vidhan bhavan Ticket Prices

Mumbai Metro 3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अॅक्वा मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज होत आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असल्यामुळं अनेकांना या मेट्रोबाबत आकर्षण आहे. आरे ते कफ परेड अशी ही मेट्रो मार्गिका 9 ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कफ परेडवरुन थेट विमानतळ आणि आरेपर्यंत या मेट्रोने जाता येणार आहे. या मेट्रोमुळं दक्षिण मुंबई थेट पश्चिम उपनगरांशी जोडली जाणार आहे. गर्दीच्या वेळ दर 5 मिनिटांनी गाडी धावणार आहे. सध्या आरे ते आचार्य अत्रे चौक या मेट्रो मार्गिकेवर सध्या मेट्रो धावतेय. तर शेवटचा टप्पा हा आचार्य अत्रे चौक आणि कफ परेड असा असणार आहे. या टप्प्याचेच आज लोकार्पण होणार आहे. 

मुंबई मेट्रो 3चे एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट कसे असतील

कफ परेडवरुन जर तुम्हाला मुंबई मेट्रो 3ने प्रवास करायला असेल तर 6 एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट असणार आहेत. 

वर्ल्ड ट्रेड सेंटर
जीडी. सोमाणी मेमोरीयल स्कुल
धोबी घाट- डॉ. आंबेडकर नगर
St Francis Xavier’s Chapel
प्रेसिडेंट हॉटेल (President Hotel)
हॉटेल ओझोन इन

विधानभवन मेट्रो स्थानकाच्या येथे 7 एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट असणार आहेत. 

महाराष्ट्र विधानभवन
स्टेट बँक ऑफ इंडिया हेडकॉर्टर्स
सचिवालय जिमखाना
फ्री प्रेस हाउस
मित्तल टॉवर्स
कूपरेज फुटबॉल ग्राउंड

असा असेल तिकीट दर

प्रवाशांना 3 किमीपर्यंतच्या अंतरासाठी 10 रुपये मोजावे लागतील. तसंच, ज्या प्रवासाचे अंतर 3 ते 12 किमी दरम्यान असेल त्यांना 20 रुपये शुल्क असेल. तसंच, 12 ते 18 किमीच्या अंतरासाठी 30 रुपये तिकीट असेल. 18 ते 24 किमीच्या प्रवासासाठी 40 रुपये. 24 ते 30 किमीच्या प्रवासासाठी 50 रुपये मोजावे लागतील. तसंच, 30 ते 36 किमीच्या प्रवासासाठी तिकीट 60 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. 

प्रमुख स्थानकांसाठी लागणारा तिकीट दर

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड: 40 रुपये
आरे JVLR ते कफ परेड:  70 रुपये
आरे JVLR ते सिद्धिविनायक: 60 रुपये
दादर मेट्रो ते चर्चगेट मेट्रो:  50 रुपये

11 स्थानके

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More