मुंबई मेट्रो 4बाबत समोर आली मोठी अपडेट, 84 टक्के काम पूर्ण; वाचा कशी आहे मार्गिका?

Mumbai Metro 4 Update: मुंबई मेट्रो 4चा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आता मेट्रोचे 84 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 4, 2025, 08:49 PM IST
मुंबई मेट्रो 4बाबत समोर आली मोठी अपडेट, 84 टक्के काम पूर्ण; वाचा कशी आहे मार्गिका?
Mumbai Metro Line 4 over 84 per cent complete MMRDA after it installs 56 metre steel span

Mumbai Metro 4 Update: मुंबई मेट्रो मार्गिका 4बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एका रात्रीत एमएमआरडीएच्या अभियंता पथकानं भांडुप ते सोनापूर (GMLR) जंक्शनवर 56 मीटर लांबीचा आणि 450 टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीपणे बसवला आहे. वडाळा ते कासारवडवली या मुंबई मेट्रो मार्गिका 4 चा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पाचे एकूण काम 84.5 टक्के इतके झाले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अवकाळी पावसासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा अत्यंत बारकाईनं आणि अचूकपणे हे काम पार पाडण्यात आलं. दोन गर्डर असलेला हा स्टील स्पॅन 9 उच्च क्षमतेच्या क्रेन्स, 2 मल्टी-अ‍ॅक्सल पुलर्स आणि 100 हून 
अधिक कुशल तंत्रज्ञांच्या साहाय्यानं बसवण्यात आला. यादरम्यान मुंबईच्या वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची देखील संपूर्ण खबरदारी बाळगण्यात आली होती. 

मेट्रो 4 मार्गिकेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार एका रात्रीत भरपावसात 450 टन वजनाचा स्टील स्पॅन बसवण्यात आला. 56 मीटर लांबीचा आणि 450 टन वजनाचा स्टील स्पॅन भांडुप-सोनापूर जंक्शनवर बसवण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या अभियंत्यांच्या पथकाने हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण केले आहे.

एमएमआरडीएने 32.32 किमी लांबीच्या मेट्रो 4 मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. तर, याच मेट्रो 4 अ मार्गिकेच्या माध्यमातून कासारवडवली-गायमुख दरम्यान करण्यात येणार आहे. मेट्रो 4 आणि मेट्रो 4अ मार्गिकेतील गायमुख-विजय गार्डनर टप्पा डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. तर, विजय गार्डन-कॅडबरी जंक्शन टप्पा मार्च 2026 मध्ये सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मेट्रो 4 मार्गिका 2027 मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. 

अशी असतील स्थानके

मेट्रो 4 आणि 4 अ मार्गावर कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीपाडा आणि गायमुख अशी स्थानके असणार आहेत. 

FAQ

1. मुंबई मेट्रो 4 आणि 4A प्रकल्प काय आहे?

मुंबई मेट्रो 4 ही वडाळा ते कासारवडवली दरम्यानची 32.32 किमी लांबीची पूर्णपणे उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो मार्गिका आहे, तर मेट्रो 4A ही कासारवडवली ते गायमुख दरम्यानची 2.7 किमी लांबीची मेट्रो 4 ची विस्तारित मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून 32 स्थानके असतील, ज्यामुळे मुंबई आणि ठाणे यांच्यातील प्रवास सुलभ आणि जलद होईल.

2. मेट्रो 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याची माहिती काय आहे?

पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन या 10.5 किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या मार्गावर 10 स्थानके असतील: कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीपाडा आणि गायमुख. या टप्प्याची कामे वेगाने पूर्ण होत असून, लवकरच सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

3. मेट्रो 4 आणि 4A च्या चाचणीबाबत काय माहिती आहे?

चाचणी सुरू होण्याची तारीख: पुढील 15 दिवसांत (सप्टेंबर 2025 मध्ये) गायमुख ते कॅडबरी जंक्शन मार्गावर चाचणी सुरू होईल.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More