Mumbai News : राज्यात एकीकडे हिंदी भाषेसंदर्भात वाद पटला आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेसंदर्भात राज्य सरकारने नवीन अध्यादेश जारी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. तरदुसरीकडे मनसैनिकांनी नालासोपाऱ्यातील एका शाळेत गोंधळ घालतला. एवढंच नाही तर शाळेच्या मुख्यापिका यांना मारहाण केली. कारण होतं दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्यामुळे हा राडा झाला. नालासोपाऱ्यातील मदर वेलंकनी शाळेत हा धक्कादायक प्रकार बुधवारी (18 जून) ला घडला. या घटनेत महिला मनसैनिकांनी शाळेच्या संचालिका आशा डिसोजा यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्टची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय नालासोपारा पूर्वेच्या तुळींज इथे आहे. दहावीचा निकाल लागून महिना उलटला तरी अजून दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही, असा आरोप पालकांनी केला. त्यानंतर यासंदर्भात जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले असता शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून बाहेरील लोकांना काठीने हाकलून द्या असं सांगण्यात आल्यानंतर मनसैनिक चिडले. त्यानंतर मोठ्या संख्येने अधिक कार्यकर्ते तिथे जमा झाले. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि शाळेच्या व्यवस्थापनात जोरदार वाद झाला आणि एकच गोंधळ पाहिला मिळाला. शाळेकडून मुलांचे दाखले अडवले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे जाब विचारायला गेलेल्या कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे शाळेतील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. शाळेतील घटनेबद्दल तुळींज पोलिसांनी कळल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी शाळेतील परिस्थिती नियंत्रणात आणली.
राज्यातील शाळा या 16 तारखेला सुरु झाला आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर मुलांना शाळेकडून सांगण्यात आले होते की, शाळा सुरु झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि निकालाची प्रत देण्यात येईल. पण शाळा सुरु होऊन तीन दिवस झाले तरी शाळेकडून मुलांना प्रमाणपत्र आणि निकालाची प्रत देण्यात येत नाही आहे, असं पालकांनी आरोप केला आहे. मंगळवारी एक विद्यार्थी शाळेत प्रमाणपत्र आणि निकालाची प्रत घेण्यास घेल्यास गेला असता त्याला शाळेतून अर्ज दे असं संचालिका आशा डिसोजा यांनी सांगितलं. पण त्या विद्यार्थ्यांचे पालक मनसैनिकांसोबत शाळेत आले आणि त्यांनी गोंधळ घातला असा आरोप शाळेकडून करण्यात आला आहे. मनसैनिकांनी शाळेची तोडफोड केली आणि आशा डिसोजा यांना मारहाण केली असा आरोपही शाळेकडून करण्यात आला आहे.
तर मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर उर्मट वागणुकीचा आरोप करून शाळेला जाब विचारल्यानंतर शाळेचे कर्मचारी अंगावर आले, असा आरोप केला आहे. आमच्यावर चप्पल उगारून धक्काबुक्की केली, असे मनसे शहर संघटक रवींद्र पाटेकर यांनी सांगितले.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(29 ov) 99/6 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.