)
BMC Housing Scheme : मुंबईत घर खरेदीचं स्वप्न महागलं आहे ही वस्तूस्थिती असली तरीही म्हाडा, सिडको आणि आता थेट मुंबई महानगरालिकेकडूनही या शहरातील घरांची सोडत नागरिकांसाठी जारी करण्यात येते. यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेली 426 घरांची सोडत चर्चेत आहे. दक्षिण मुंबईत ही घरं उपलब्ध होत असल्यानं या योजनेसंदर्भात कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या सोडतीसंदर्भात कोणतीही शंका आणि सविस्तर माहिती, मदतीसाठी 022-22754553 या मदतसेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आणखी एक पर्याय म्हणजे ‘सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400001’ या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा, अशीही माहिती प्रशासनानं जारी केली आहे.
बीएमसी घरकुल योजनेबद्दल सांगा?
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने दक्षिण मुंबईत 426 सदनिका (घरे) विक्रीसाठी सोडत काढली आहे. ही योजना अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) साठी आहे.
ही घरं कुठे आणि किती आहेत?
दक्षिण मुंबईत एकूण 426 सदनिका उपलब्ध आहेत. ही योजना मुंबईतील घरखरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी महाडा, सिडकोप्रमाणे बीएमसीकडून सुरू करण्यात आली आहे
योजनेसाठी पात्र कोण?
अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) मधील नागरिक पात्र आहेत. संपूर्ण प्रक्रिया 16 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान होईल. इच्छुकांनी पात्रता तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर माहिती पाहावी.