'आम्ही हाती शस्त्र घ्यायला तयार... डॉक्टर मूर्ख'; CM फडणवीसांचं नाव घेत जैन धर्मगुरुंची वादग्रस्त विधानं

Jain Community Muni on pegions kabutar khana : मुंबईतील कबुतरखाने, राजकारण आणि मुख्यमंत्र्यांसह मंगलप्रभात लोढा यांचं नाव घेत नेमकं काय म्हणाले जैन धर्मगुरू?   

सायली पाटील | Updated: Oct 11, 2025, 12:17 PM IST
'आम्ही हाती शस्त्र घ्यायला तयार... डॉक्टर मूर्ख'; CM फडणवीसांचं नाव घेत जैन धर्मगुरुंची वादग्रस्त विधानं
Mumbai news jain community muni on pegions kabutar khana doctors make rebelious statments in religious meeting

Jain Community Muni on pegions kabutar khana : मुंबईतील (Mumbai kabutarkhana) कबुतरखाने तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जैन धर्मियांनी या निर्णयाविरोधात नाराजीचा तीव्र सूर आळवला. पुढं कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समुदायाने प्रार्थना सभेचं आयोजन केलं, असून, या धर्मसभेत जैन धर्मगुरुंनी काही वादग्रस्त वक्तव्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासंदर्भातही वादग्रस्त वक्तव्य केलं. 

Add Zee News as a Preferred Source

...तर आम्ही हाती शस्त्र घ्यायला तयार! 

'प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर आम्ही हाती शस्त्र घ्यायला तयार आहोत' अशा आशयाचं वक्तव्य धर्मसभेमध्ये जैन धर्मगुरूंनी केल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

'आमच्या मध्ये एक मानलं जातं ते आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाला तर, आम्ही त्याचं उत्तर देतो. मग त्यामध्ये शस्त्र उचलले तरी चालतील. जे सत्तेत आहेत त्यांना साधुसंतांनी बसवलं आहे. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. आम्ही साधुसंत रस्त्यावर उतरू नागा साधू मोठ्या प्रमाणावरती आम्ही एकत्र जमवू आणि आंदोलन करु' अशा शब्दांत या सभेत स्वरुपानंद महाराज यांनी इशारा दिला. 

'सरकारची मिलीभगत आहे... डॉक्टर मूर्ख'

'मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नाही आले हे सरकारची मिलीभगत आहे', असंही धर्मगुरू कैवल्य महाराज म्हणाले. मी जाहीरपणे सांगतोय हे फक्त तुमचं मिलीभगत राजकारण आहे. बाकी काही नाही! कबुतराला तुम्ही फक्त एक निमित्त केलं आहे, ते हत्यार केलं आहे. कबुतराशी इथं काही घेणंदेणं नाही. त्यांच्या विष्ठेपासून पसरणाऱ्या रोगांचंही इथं घेणंदेणं नाही. एखाद्याचाच काय तर, हजारो, लाखोंचा मृत्यू ओढावला त्यांच्यासाठी कोणी विचार करत नाहीये. कबुतरांच्या विष्ठेनं एखाद्याचा मृत्यू झाला असं म्हणणाऱ्या डॉक्टरांनाही मूर्ख मानतो असं वक्तव्य त्यांनी करत 'कबूतर शांती प्रिय प्राणी आहे. जर पशुपक्ष्यांचे निसर्ग चक्र चालले नाही तर नाश होईल' याचा पुनरुच्चार केला. 

'आमचा धर्म सांगतो मरायचं असेल दुसऱ्यासाठी तरी चालेल, रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाच आहे हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे . एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं, तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको', असं म्हणत त्यांनी कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर जैन समाजाची भूमिका स्पष्ट केली. 

FAQ

मुंबईतील कबुतरखान्यांबाबत जैन समुदायाची भूमिका काय आहे?
मुंबईतील कबुतरखाने तूर्तास बंद करण्याच्या निर्णयानंतर जैन धर्मीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू पावलेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायाने प्रार्थना सभा आयोजित केली. 

जैन धर्मगुरूंनी 'हाती शस्त्र घेण्याचा' इशारा का दिला?
प्रार्थना सभेत स्वरुपानंद महाराज यांनी म्हटलं, 'प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर आम्ही हाती शस्त्र घ्यायला तयार आहोत.' जर प्राण्यांवर हल्ला झाला तर आम्ही उत्तर देऊ, शस्त्र उचलले तरी चालेल. आम्ही नागा साधूंसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

कैवल्य महाराज यांनी सरकारवर काय आरोप केले?
कैवल्य महाराज यांनी म्हटलं, 'मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित नसल्याने सरकारची मिलीभगत आहे.' हे फक्त राजकीय खेळ आहे, कबुतरांना निमित्त बनवलं आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More