अल्टीमेटम! BMC निवडणुकीत नवा पक्ष; जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा

Jain Muni on BMC Election : आताच्या क्षणाची मोठी बातमी! महायुती, शिवसेना, मनसेला ललकारणार जैन समाजाचा जनकल्याण पक्ष. काय आहे चिन्हं, काय असेल हेतू?   

सायली पाटील | Updated: Oct 11, 2025, 12:52 PM IST
अल्टीमेटम! BMC निवडणुकीत नवा पक्ष; जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा
Mumbai news jain community muni to participate in bmc election with the party sign pegion latest news

Jain Muni on BMC Election : मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा आता चांगलाच वादाचा विषय ठरत असून, जैन समाजातील काही मुनींनी या मुद्द्यावरून भर कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचंही पाहायला मिळालं. 'प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर शस्त्र घ्यायला तयार आहोत, असं म्हणत कबुतरांवरुन जैन धर्मगुरुचं वादग्रस्त विधान जैन समाजाकडून आयोजित पार्थना सभेत करण्यात आलं. 

Add Zee News as a Preferred Source

साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवल्याचंही वक्तव्यही यादरम्यान सर्वांच्या नजरा वळवून गेलं. याचदरम्यान कबुतर हे फक्त राजकारणाचं निमित्त आहे असं वक्तव्य करणाऱ्या जैन धर्मगुरू आणि मुनींकडून थेट आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा करण्यात आली. 

'आमचा पक्ष भगवान महावीरांचा पक्ष असेल'

मृत कबुतरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेनंतर जैन धर्मगुरू आणि मुनींनी पत्रकार परिषद घेत 'शांतीदूत जनकल्याण पार्टी'ची घोषणा करत आपण राजकीय पक्ष काढत असल्याची ग्वाही दिली. 'कबुतर आमचं चिन्ह असून, बीएमसी निवडणुकीत उमेदवार उभे करणार. आमचा पक्ष भगवान महावीरांचा पक्ष असेल, राजकीय नव्हे. संत कधी कोणत्या पक्षाला पाठिंबा देत नाहीत' असं म्हणत जैन मुनींकडून सरकारला दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळं आता या प्रकरणी सरकार काय भूमिका घेतं हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. 

'आज आम्हा जैन धर्मियांचं जे चिन्हं आहे ते शांतिदूत कबुतर आहे. त्यामुळं इथं आज आम्ही शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करत आहोत. ही फक्त जैन धर्मियांची पार्टी नाही. जितके मारवाडी, गुजराती आहेत त्या सर्वांचा हा पक्ष असून, महानगरपालिकेमध्ये आम्ही आमचे वाघ उभे करु', असं जैन मुनी आव्हान देत म्हणाले. 

आम्हाला मोदींवर विश्वास... 

सरकारला दिवाळीपर्यंतचा अल्टीमेटम देत आम्हाला मोदींवर विश्वास असल्याचं या जैन मुनींनी पत्रकार परिषदेत अधोरेखित केलं. 'आम्हाला मोदींवर विश्वास आहे, 370 अनुच्छेद हटवला, राम मंदिर बनवलं... आमचा सकल जैन समाज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना आमचं निवेदन सादर करू. दिवाळीाधी जर आमची मागणी मान्य केली तर आम्ही ज्यांचे आहोत त्यांचेच राहू, अन्यथा महावीरांचं चिन्हं वाघ आहे, त्यामुळं आमचा हा पक्ष महावीरांचाच पक्ष असून जितके उमेदवार असतील ते वाघच असतील', अशा शब्दांत या मुनींनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून ललकारणारे शब्द उच्चारले. 

FAQ

जैन मुनींनी कबुतरखान्याच्या मुद्द्यावर कोणती वादग्रस्त वक्तव्ये केली?
प्रार्थना सभेत जैन धर्मगुरूंनी म्हटलं, 'प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर आम्ही शस्त्र घ्यायला तयार आहोत.' तसेच, साधू-संतांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवल्याचा दावा केला. 

जैन मुनींनी कोणता नवीन राजकीय पक्ष घोषित केला?
मृत कबुतरांसाठी आयोजित प्रार्थना सभेनंतर पत्रकार परिषदेत जैन मुनांनी 'शांतिदूत जनकल्याण पार्टी'ची घोषणा केली. कबुतर हे पक्षाचे चिन्ह असून, बीएमसी निवडणुकीत उमेदवार उभे करणार. 

या पक्षाचा विस्तार कोणत्या समाजांपर्यंत असेल?
मुनींनी म्हटलं, 'आज आम्हा जैन धर्मीयांचं चिन्ह शांतिदूत कबुतर आहे. ही फक्त जैनांची पार्टी नाही, तर मारवाडी, गुजरातींसह सर्वांची. महानगरपालिकेत आम्ही आमचे वाघ उभे करू.' यातून पक्षाचा विस्तार व्यापारी आणि इतर समाजांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू दिसतो.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More