ब्युरो रिपोर्ट झी 24 तास: (Mumbai News) मुंबई शहर.... या शहराची प्रतिमा म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. सतत जागं असणारं शहर आणि अनेकांच्याच उदरनिर्वाहात मोलाचा हातभार लावणारं शहर. अशा या मुंबई शहराचं भविष्य मात्र आता धोक्यात दिसत आहे. किंबहुना भविष्यात मुंबईचं अस्तित्वंच असेल की नाही? हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही धास्ती वाढवण्यास कारण ठरत आहे नुकताच समोर आलेला एक अध्ययनपर अहवाल.
देशाची आर्थिक राजधानी आणि जगातील महागड्या शहरांपैकी एक असणाऱ्या या मुंबई शहारला एक मोठा धोका असून, पुढील 25 वर्षात शहर नामशेष होणार असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. या संशोधनपर निरीक्षणानुसार मुंबईचा 21.8 टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
मॅकगिल युनिवर्सिटीच्या निरीक्षणपर अहवालातील माहितीनुसार 2050 पर्यंत मुंबईचा 21.8% भाग पाण्याखाली जाण्याची भीती आहे. यामागे काही महत्त्वाच्या कृती आणि गोष्टी कारणीभूत ठरणार आहेत. जीवाश्म इंधनांचा जसे की कोळसा आणि तेल वापर थांबवला नाही तर शतकाच्या अखेरीस जगभरातील 10 कोटींहून अधिक इमारती पाण्याखाली जाऊ शकतात, हा धोक्याचा इशारा असून, तो बळावताना दिसत आहे.
गेट वे ऑफ इंडिया डोळे भरुन पाहून घ्या, नरिमन पॉईंट आणि कुलाबा फिरून घ्या, शिवाजी पार्कही डोळ्यात साठवून ठेवा, सीएसएमटी स्टेशनवरही एक फेरफटका मारुन घ्या. कारण येत्या काही वर्षांत हे सगळं पाण्याखाली जाणार आहे. थट्टेचा विषय नाही, हे होऊ शकतं!
मुंबई काही वर्षांनी बुडणार आहे. ब्रिटीश राजवटीत परकीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेलं हे शहर पुढं इतिहास घडवून गेलं. मात्र आता हीच मुंबई समुद्रात बुडण्याची शक्यता आहे. मॅकगिल विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार मुंबईचा 21.08 टक्के भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
समुद्राच्या पातळीत सातत्यानं होणारी वाढ तसंच जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे. बर्फ वितळण्याचा वेग असाच कायम राहिल्यास समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळं 2050 पर्यंत मुंबईला जलसमाधी मिळेल अशी भीती या संधोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईतील शान असणारं गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा, मलबार हिल, दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर आणि वर्सोवा समुद्राच्या पाण्यात बुडण्याची भीती आहे.
वरील गोष्टी स्पष्ट करणारा नकाशाही शास्त्रज्ञांनी तयार करत कोणत्या शहरांना तापमान बदलाचा फटका बसू शकतो याची माहिती संकलीत केली आहे. जीवाश्म इंधनांचा उदा. कोळसा आणि खनिज तेल, पेट्रोल, डिझेलचा वापर थांबवला नाही तर शतकाच्या अखेरीस जगभरातील 10 कोटींहून अधिक इमारती पाण्याखाली जाऊ शकतात. मुंबईलाही याचीच भीती आहे.
जवळपास निम्मी मुंबई समुद्र गिळून टाकणार असून, ही भीती फक्त मुंबईसाठीच नसून मुंबईजवळच्या ठाणे आणि नवी मुंबईलाही आहे. मुंबईतील अनेक भाग समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आले आहेत ही वस्तूस्थिती. थोडक्यात हा संपूर्ण भाग समुद्राचाच आहे. तर, तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढतेय ही नाण्याची दुसरी बाजू.
ही तापमानवाढ अशीच राहिली तर मुंबई पाण्याखाली जाण्यास फक्त 25 वर्ष उरलीयेत असं सूचित केलं जात आहे. गेल्या काही वर्षात शिवाजी पार्क परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी शिरतंय येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे. ज्या माणसांनी मुंबई तयार केली त्याच माणसांच्या वारसदारांमुळे मुंबई कायमची पाण्याखाली जाणार आहे आणि नव्या पिढीसाठी उरेल फक्त भीतीदायक भविष्य...!!!
मुंबईच्या भविष्याबाबत हा अभ्यास काय सांगतो?
मॅकगिल विद्यापीठाच्या (McGill University) संशोधनानुसार, जलवायू बदलामुळे समुद्र पातळी वाढत असल्याने पुढील 25 वर्षांत (2050 पर्यंत) मुंबईचा 21.8% भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील कोणत्या ठिकाणांना धोका आहे?
गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा, नरिमन पॉईंट, मलबार हिल, दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर, वर्सोवा आणि शिवाजी पार्कसारखे ऐतिहासिक आणि व्यावसायिक भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवर हा धोका काय आहे?
मॅकगिल अभ्यासानुसार, जीवाश्म इंधनांचा वापर सुरू राहिला तर शतकाच्या अखेरीस जगभरातील 10 कोटींहून अधिक इमारती पाण्याखाली जाऊ शकतात.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.