)
Western Express Highway Traffic Update: पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी झपाट्याने वाढत चालली आहे. अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल पाउण तास ते एक तास लागतो. या वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. सध्या मेट्रोची कामेदेखील जोरात चालली आहेत. पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटण्यासाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती समोर येतेय.
पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या पूल विभागाकडून गोरेगाव ते ओशिवरा केबल स्टेड प्रकारातील पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलासाठी 418 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल 2028पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील एस व्ही रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार आहे.
केबल स्टेड पुलामुळं ओशिवरा-गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. या परिसरात व्यावसायिक कार्यालये, नवे गृहनिर्माण प्रकल्प व मनोरंजन क्षेत्रासाठी हब मानला जातो. ओशिवरा-लोखंडवाला हा पट्टा या पुलामुळं एसव्ही रोडमार्गे अधिक सुलभतेने जोडला जाणार आहे. त्यामुळं नागरिकांचा वेळदेखील वाचेल आणि इंधनाची बचतदेखील होईल. या पुलाची रचना 542 मीटर या पुलाची लांबी असेल तर 28.55 मीटर रुंदी असणार आहे. 6 मार्गिका असतील तर 3 मार्गिका दोन्ही दिशांना रहदारीसाठी खुल्या असतील. 36.6 मीटर रुंदीच्या शहर विकास आराखड्यातील रस्त्याशी पुलाला जोडणी दिली जाणार आहे.
उत्तर: पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी झपाट्याने वाढत आहे. अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या पाउण तास ते एक तास लागतो. पालिकेकडून (बीएमसी) अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत, ज्यात मेट्रोचे काम जोरदार चालू आहे. या कोंडी फुटण्यासाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
उत्तर: पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या पूल विभागाकडून गोरेगाव ते ओशिवरा केबल स्टेड प्रकारातील पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर एस व्ही रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी फुटेल.
उत्तर: या पुलासाठी ४१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल २०२८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.