)
Mumbai Children Hostage Crisis: मुंबईतील पवईतील आरए स्टुडिओमध्ये एका तरुणाने 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवलं. स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग आणि ऑडिशन्स सुरू असताना ही घटना घडली. खिडक्यांमधून मुलांना बाहेर डोकावताना पाहून जवळच्या लोकांमध्ये खळबळ उडाल्याच पाहिला मिळालं. या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी रोहीत आर्यला अटक करण्यात आलीय. पोलिसांना रोहित आर्यकडे काय काय सापडलं? पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? सविस्तर जाणून घेऊया.
मुंबईतील आरए स्टुडिओमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलांसाठी ऑडिशन्स सुरू होते. युट्यूबर असल्याचा दावा करणारा रोहित आर्य नावाचा तरुण या ऑडिशन्स घेत होता. त्याने आज सकाळी सुमारे 100 मुलांना ऑडिशन्ससाठी बोलवलं होतं. दुपारी 1 वाजेपर्यंत त्याने सुमारे 80 मुलांना घरी पाठवलं होतं, तर उर्वरित 17 मुलांना एका खोलीत बंद केलं होतं. जेव्हा मुलं आवाज करू लागली आणि खिडक्यांमधून बाहेर डोकावू लागली तेव्हा लोकांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या अनेक पथकं घटनास्थळी पोहोचली. स्टुडिओला घेराव घालण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. मुलांची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे असे पोलिसांनी माध्यमांना सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी 17 मुलांची सुखरूप सुटका केली आहे.
शुटींगच्या नावाने मुलांना ओलीस ठेवण्यास आलं होतं.सर्व मुलांना डांबून ठेवण्यात आलं होतं. गेल्या 6 दिवसांपासून या स्टुडीयोत शूटींग सुरु होतं. घटना घडली तेव्हा मी इथेच होतो. दुपारी मुलं जेवायला बाहेर येतात पण आली नसल्याने भीती वाटली. पोलीस कर्मचारी आणि फायर ब्रिगेडच्या मुलांनी चांगले कार्य केले. पोलिसांनी सर्वच मुलांची सुटका केली अशी माहिती स्थानिकांनी दिली.
पवई पोलिसांना पावणे नऊ वाजता फोन आला. पवईत महावीर क्लासेस येथे मुलांना एकाने डांबून ठेवलंय, असं संबंधिताने सांगितलं. आम्ही त्याच्याशी चर्चा केली. मुंबई पोलीसांनी फोर्सचा वापर करुन 17 मुलं आणि 1 सिनिअर आणि 1 नागरिकाला सुरक्षित आणलं. पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात आरोपी जखमी झालाय, अशी माहिती डीसीपी दत्ता नलावडेंनी दिली.
त्याच नाव रोहित आर्य असे आहे. त्याच्याकडे एअर गन आणि केमिकल्स दिसले. आरोपी एकटाच होता. आणखी त्याच्याकडे काय हत्यार होतं का? हे तपासाअंती समोर आल्याचे नलावडे म्हणाले. आम्ही त्याच्याशी बातचित सुरु केली. तो आपल्या मागण्यांवर ठाम होता. यानंतर पवई पोलिसांनी बाथरुममधून फोर्स एन्ट्री केल्याची माहिती डीसीपी दत्ता नलावडेंनी माहिती.
आरोपीचा इतिहास शोधला जाईल. याच्या नक्की मागण्या काय होत्या याबाबत तपास केला जातोय. वेबसिरीजच्या ऑडीशनसाठी त्याने मुलांना बोलावलं होतं. हे ऑपरेशन मुंबई पोलिसांसाठी खूप चॅलेंजिंग होते. आत लहान मुलं होती. त्यांना वाचवणं हे मोठं आव्हान होतं. आमच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करत सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं.