Mumbai Mega Block: रविवारी कामासाठी बाहेर पडणार आहात? मेगाब्लॉकची माहिती घेऊनच करा प्लनिंग

Mumbai Mega Block on Sunday: रविवारी कामासाठी बाहेर पडण्याआधी कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे हे जाणून घ्या ज्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा नाही होणार.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jun 21, 2025, 08:28 AM IST
Mumbai Mega Block: रविवारी कामासाठी बाहेर पडणार आहात? मेगाब्लॉकची माहिती घेऊनच करा प्लनिंग
Mumbai Sunday mega block june 22 train services affected on central and harbour lines matunga to mulund mankhurd to nerul

Mumbai mega block: मुंबईकरांनी रविवारचा प्रवास नियोजनपूर्वक करावा, कारण दर आठवड्याप्रमाणे या रविवारीही मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये यासाठी रविवारी नक्की कुठे आणि किती वाजता मेगा ब्लॉक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी (22 जून) महत्त्वाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री (21 जून) देखभाल-दुरुस्तीसाठी नाइट ब्लॉक होणार आहे. मात्र, रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल. चला कोणत्या मार्गावर नक्की कसा ब्लॉक आहे आणि त्यामुळे कसा परिणाम होईल हे जाणून घेऊयात. 

 मध्य रेल्वे मेगाब्लॉक (Main Line)

ब्लॉक स्थानकं: माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन धीम्या मार्गावर)

वेळ: सकाळी 11.5 ते दुपारी 3.55

परिणाम:
या वेळेत सीएसएमटीहून निघणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल्सना जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर येतील. या लोकल्स 15 मिनिटांनी उशिराने धावण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्ग (Harbour Line):

ब्लॉक स्थानकं: मानखुर्द ते नेरुळ (अप आणि डाऊन मार्ग)

वेळ: सकाळी 11.15 ते दुपारी 4.15

परिणाम:
या कालावधीत सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सर्व लोकल्स रद्द होतील. यावेळी विशेष लोकल्स सीएसएमटी–मानखुर्द व पनवेल–नेरुळ/ठाणे या मार्गांवर चालवण्यात येतील. प्रवाशांना ट्रान्सहार्बर किंवा मुख्य मार्गाचा पर्याय देण्यात येईल.

पश्चिम रेल्वे नाइट ब्लॉक (western line night mega block) 

स्थानकं: बोरिवली ते भाईंदर (अप आणि डाऊन जलद मार्गावर)

वेळ: शनिवारी रात्री 11.15 ते रविवारी पहाटे 4.15

परिणाम:
विरार/वसई रोडहून बोरिवलीकडे जाणाऱ्या जलद लोकल्सना धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. काही लोकल्स रद्द देखील होतील.