मुंबई :  'ताज'मध्ये बंदूक घेऊन दोन व्यक्ती घुसल्याचा निनावी  फोन आला सुरक्षा यंत्रणेची धावाधाव सुरु झाली. त्याआधी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पसरली होती. त्यानंतर आता कुलाब्यातील ताज हॉटेलमध्ये दोन मास्कधारी व्यक्ती बंदुकीसह घुसले असल्याच्या फोन आला आणि भीतीची पुन्हा दहशत पसरली. फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि घटनास्थळाची पाहणी करण्यास दाखल झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानी दहशतवादी कसाबने हा हल्ला केला होता. त्याच्या कटू आठवणी एकदम ताज्या झाल्या. बंदुकधारी व्यक्ती घुसल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून घटनास्थळाची पाहाणी केली गेली. त्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले.



फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत हा फोन कुठून आला, याचा शोध घेतला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका 14 वर्षीय मुलांने हा फोन केल्याचे पुढे आले आहे. चौकशीअंती हा फोन कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत त्याच्या वडिलांना काहीच माहित नसल्याचे समोर आले आहे. मात्र, मुलाने हे का केले, याची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकणी पोलीस अधिक तपास करत आहेत.