मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन लोकलसेवा कोलमडली आहे. मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना चहा, बिस्किट आणि पाण्याचं वाटप काही स्थानिक नागरिकांनी केलं. विजय प्रकाश सेवा मंडळाला लालबागचा राजा गणेश मंडळाने प्रवाशांना चहा बिस्किटे आणि पाणी वाटपासाठी ही मदत केल्याचं योगेश पाटील यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबागचा राजा गणेश मंडळाचे सुधीर साळवी यांनी ही प्रवाशांपर्यंत ही मदत तात्काळ पोहोचवण्याची विनंती केल्यानंतर, विजय प्रकाश सेवा मंडळाचे कार्यकर्ते मदतीला सरसावले. या मदतीनंतर अनेक वृद्ध प्रवाशांनी आणि महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे. 



मुंबईत अडचणीत प्रवाशांना असा मदतीचा हात मिळाल्यानं, रेल्वेवरील संतापाचं वातावरण काहीस शांत होताना दिसत होतं. यानंतर अनेकवेळ प्रवासी प्लॅटफॉर्मवर बसून होते. पण पाणी आणि चहा-बिस्किट मिळाल्यानंतर काहीसं समाधान आणि थकवा जाण्यास प्रवाशांना निश्चितच मदत झाली.