विधानसभेत मुंबई विद्यापीठाच्या नावानं 'चांगभलं'!

मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. 

Updated: Aug 1, 2017, 03:47 PM IST
विधानसभेत मुंबई विद्यापीठाच्या नावानं 'चांगभलं'! title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. 

विद्यापीठाच्या गोंधळामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. तसंच या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. तर मुख्यमंत्र्यांनीही विद्यापीठ नव्या पद्धतीनुसार काम करू शकलेले नसल्याची कबुली दिलीय. भविष्यात काळजी घेण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली. तर दुसरीकडे विधानभवनाच्या बाहेर कुलगुरूंविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी अभाविपनं 'कुलगुरू हटाव'च्या घोषणा दिल्या.

युवासेनेचा मोर्चा

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या युवासेने तर्फे मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथे मोर्चा काढला. या मोर्चात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

शैक्षणिक संस्थांवर तरी किमान गुणवत्तेच्या आधारे नेमणुका करा आणि विद्यापीठात सुरू असलेल्या अराजकाला जबाबदार धरत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी युवासेने तर्फे करण्यात आली. तर, १५ ऑगस्टपर्यंत निकाल लावणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी माहिती दिल्याचा दावा युवासेनेनं केला आहे.