Mumbai University Admission: देशातील अग्रगण्य व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चारही विद्याशाखांमध्ये गुणवत्ता आणि संशोधनाधारित अभ्यासक्रमांची रचना करून उच्च शिक्षणाच्या संधीचे दालन खुले करण्यात आले आहे. 100 वर्षांहून अधिक जुन्या शैक्षणिक विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या प्रसिद्ध आणि पारंपारिक अभ्यासक्रमांसह नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे. कालपरत्वे बदलत्या गरजा आणि उद्योन्मुख क्षेत्रातील संधीचे नवीन दालन लक्षात घेता विद्यापीठाने आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, डेटा एनॅलिटिक्स, सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कम्प्युटिंगसह विविध अभ्यासक्रम सुरु केले आहेत. तसेच उद्योग, संशोधन आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊनही विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा वैविध्यपूर्ण वातावरणात उच्च शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम व्हायला मदत होऊ शकणार आहे.
एम.एस्सी. इन फायनान्स, जैवतंत्रज्ञान (Biotechnology), जैव भौतिकशास्त्र (Bio-Physics), जीवनशास्त्र – मत्स्यपालन तंत्रज्ञान (Life Science – Aquaculture Technology), जैवरसायनशास्त्र (Biochemistry),पर्यावरण जैवतंत्रज्ञान (Environmental Biotechnology), ऑरगॅनिक केमिस्ट्री (स्वायत्त), अॅनालिटिकल केमिस्ट्री (स्वायत्त), इनऑर्गॅनिक केमिस्ट्री (स्वायत्त), फिजिकल केमिस्ट्री (स्वायत्त), इंडस्ट्रियल पॉलिमर केमिस्ट्री (स्वायत्त), संगणकशास्त्र (Computer Science), डेटा सायन्स (Data Science), गणित (Mathematics), भौतिकशास्त्र (Physics - स्वायत्त), पर्यावरणशास्त्र (Environmental Science), प्राणीशास्त्र – महासागरीय अभ्यास (Zoology – Oceanography), सांख्यिकी (Statistics), नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, डेटा अॅनालिटिक्स, मरीन स्टडीज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग, ऑरगॅनिक, इनऑर्गॅनिक, अॅनालिटिकल आणि फिजिकल केमिस्ट्री, माहिती तंत्रज्ञान (Information Technology),भूगोल व जिओस्पेशल तंत्रज्ञान, एमटेक इन केमिकल इंजिनीअरिंग, संगणक अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सह पदवीसाठी एम.एस.इन डेटा अॅनालिटिक्स,सायबर सिक्युरिटी,केमिकल सायन्सेस या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
अरेबिक,आफ्रिकन स्टडीज, संज्ञापन व पत्रकारिता, जनसंपर्क, राज्यशास्त्र, सार्वजनिक धोरण (Public Policy) युरेशियन अभ्यास, अर्थशास्त्र (स्वायत्त), इंग्रजी अभ्यास, फ्रेंच, गुजराती, जर्मन (बी.ए./एम.ए. एकत्रित अभ्यासक्रम), हिंदी, इतिहास, कन्नड, भाषाशास्त्र, मराठी, मानसशास्त्र भूगोल व जिओस्पेशल तंत्रज्ञान, पर्शियन, तत्त्वज्ञान, पाली आणि बौद्ध अभ्यास, पाली – ५ वर्षांचा एकत्रित बीए/एमए अभ्यासक्रम, रशियन अभ्यास, सिंधी, समाजशास्त्र, संस्कृत,योगशास्त्र, अर्थशास्त्र (पारंपरिक व सांस्कृतिक दृष्टीने), पुराणे व महाकाव्ये, शुद्ध संस्कृत साहित्यातील अभ्यास, उर्दू, ग्रामीण विकास, पुरातत्वशास्त्र, अवेस्ता-पहलवी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये मास्टर्स (Master of Performing Arts):
हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, लोककला, रंगभूमी (नाटक) एम.ए. इन डॉ. आंबेडकर स्टडीज, विकास अभ्यास, आंतरराष्ट्रीय संबंध व धोरण अभ्यास, नेतृत्व अध्ययन, हिंदू स्टडीज आणि कीर्तनशास्त्र तसेच एम.एस.डब्ल्यू.– सामाजिक कार्यातील पदव्युत्तर पदवी ग्रंथालय व माहितीशास्त्रातील पदवी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
एम.कॉम. व्यवसाय व्यवस्थापन, बँकिंग व फायनान्स, प्रगत लेखाशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सिक्युरिटी, कायदा व फॉरेन्सिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, आंतरराष्ट्रीय धोरण व रणनीती अभ्यास, टेम्पल मॅनेजमेंट, प्लेबॅक सिंगिंग अँड स्टेज परफॉर्मन्स अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
वरील सर्व अभ्यासक्रमांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि इतर तपशील मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला असून प्रवेशसाठी विद्यार्थ्यांनी https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.