)
Mumbai News : पिसे आणि पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत मीटर अद्ययावतीकरणाच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडून मंगळवारपासून गुरुवारपर्यंत 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. या कामामुळे शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पाण्याची कमतरता भासत आहे.
मंगळवारी पहिल्याच दिवशी दक्षिण मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. काही भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागला. ही परिस्थिती बुधवार आणि गुरुवारीही कायम राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि आवश्यकतेनुसार साठवणूक करण्याचे आवाहन केले आहे.
या काळात जलशुद्धीकरण केंद्रातील 100 किलोवॅट विद्युत केंद्रामधील मीटर अद्ययावत करण्याची व मीटर जोडणीची कामे दुपारी 12.30 ते 3.00 या वेळेत म्हणजेच सुमारे अडीच तास चालणार आहेत. या कालावधीत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
ए विभाग: नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट
बी विभाग: क्रॉफर्ड मार्केट, मोहम्मद अली रोड, पायधुनी, भेंडीबाजार
ई विभाग: नागपाडा, आग्रीपाडा, भायखळा, माझगाव, राणीबाग परिसर
एफ दक्षिण विभाग: परळ, लालबाग, काळाचौकी, शिवडी, वडाळा
एफ उत्तर विभाग: माटुंगा, सायन, अँटॉप हिल
एल विभाग: कुर्ला पूर्व परिसर
एम पूर्व विभाग: गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, बैंगनवाडी
एम पश्चिम विभाग: चेंबूर परिसर
एन विभाग: विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर
एस विभाग: भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी पूर्व
टी विभाग: मुलुंड पूर्व आणि पश्चिम
महापालिकेच्या मते, पाणीपुरवठा हळूहळू नियमित होण्यासाठी काही काळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रश्न 1: मुंबईत पाणी कपात का करण्यात आली आहे?
उत्तर: पिसे आणि पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी तांत्रिक कारणास्तव तीन दिवस – मंगळवार, बुधवार आणि गुरुवार – 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
प्रश्न 2: ही पाणीकपात किती काळ राहणार आहे?
उत्तर: पाणी कपात ३ दिवस म्हणजे ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येईल.
प्रश्न 3: कोणत्या वेळेत पाणीपुरवठा प्रभावित राहील?
उत्तर: दुपारी 12.30 ते 3.00 या वेळेत विद्युत मीटरचे अद्ययावतीकरण आणि जोडणीचे काम होणार असल्याने या काळात पाणीपुरवठा सर्वाधिक प्रभावित होईल.
प्रश्न 4: कोणत्या भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवणार आहे?
उत्तर: दक्षिण मुंबईपासून पूर्व उपनगरांपर्यंत अनेक भागांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे. प्रमुख प्रभावित विभागांमध्ये नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट, परळ, माटुंगा, सायन, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड यांचा समावेश आहे.
प्रश्न 5: महापालिकेने नागरिकांना कोणती सूचना केली आहे?
उत्तर: मुंबई महापालिकेने नागरिकांना पाणी जपून आणि साठवून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यक पाणी वापर टाळावा, असे सांगितले आहे.
प्रश्न 6: पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होणार आहे का?
उत्तर: नाही, पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र, काही भागांत पाणी कमी दाबाने येईल आणि काही वेळा पुरवठा मंदावलेला राहू शकतो.