Jogeshwari Terminus: गेल्या तीन दशकापासून रखडलेले मुंबईतील चौथे टर्मिनस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. नवीन जोगेश्वरी टर्मिनस लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या नवीन टर्मिनसमुळं पश्चिम रेल्वेवरील वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसवरील ताण कमी होणार आहे.
1991 मध्ये कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस बांधण्यात आले. त्यानंतर मुंबई शहरात व उपनगरात कोणतेही टर्मिनस बांधण्यात आले नव्हते. कुर्ला टर्मिनसमुळं दादर आणि पनवेल मेल आणि एक्स्प्रेससाठी अपग्रेड करण्यात आले मात्र नवीन कोणतेही टर्मिनस बांधण्यात आले नव्हते. नवीन होणारे जोगेश्वरी टर्मिनस हे जोगेश्वरी आणि राम मंदिराच्या मधोमध असणार आहे. या टर्मिनसमध्ये कॅब, ऑटो आणि इतर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे.
>> जोगेश्वरी नवीन टर्मिनससाठी 76.84 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
>> जोगेश्वरी टर्मिनसवर तीन प्लॅटफॉर्म असणार आहेत. त्यातील एक प्लॅटफॉर्म आयलँड, एक होम प्लॅटफॉर्म असून या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटर असणार आहे. त्याचबरोबर प्लॅटफॉर्म 2 आणि 3 पहिल्या टप्प्यात वाहतूकीसाठी सुरू करण्यात येणार आहेत. तर, प्लॅटफॉर्म 1 काही कालावधीनंतर सुरू होणार आहे.
>> जोगेश्वरी टर्मिनसवर 24 डब्यांच्या ट्रेनची वाहतूक होऊ शकते
>> दिवसभरात 12 मेल आणि एक्स्प्रेस टर्मिनसवर थांबू शकतात.
>> गाड्यांच्या पार्किंगसाठी दोन बर्थिंग लाईन्स आणि शंटिंग ऑपरेशन्ससाठी एक अतिरिक्त लाईन.
>> गाड्यांना पाणी देण्याची सुविधा, ज्यामुळे मोठ्या देखभालीशिवाय प्लॅटफॉर्म-रिटर्न सेवा शक्य होतात.
>> ऑपरेशनल विभाग आणि रिले रूमसाठी ग्राउंड+2 सेवा इमारती
>> टर्मिनसला राम मंदिर स्टेशनशी जोडणारा 6 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी एस्केलेटर आणि लिफ्टने सुसज्ज.
>> नवीन टर्मिनसवरील तिन्ही प्लॅटफॉर्मना जोडणारा 12 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज.
>> ग्राउंड+3 प्रवासी स्टेशन इमारत
>> एसी व्हीआयपी आणि जनरल वेटिंग लाउंज (बाथ, टॉयलेट, मोबाईल चार्जिंग आणि पेंट्री सुविधांसह),
>> 4 एसी आणि 4 नॉन-एसी डबल-बेड रिटायरिंग रूम,
>> प्रत्येकी 6 बेडसह वसतिगृहे
>> फूड प्लाझा, मनोरंजन क्षेत्र आणि पूर्ण सुविधांसह 50 परवानाधारक हमालांसाठी विश्रांती क्षेत्र.
या स्टेशनमध्ये ओला/उबर, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षांसाठी स्वतंत्र पिकअप/ड्रॉप झोनसह सुविधा असणार आहे. तसंच, पार्किंग, व्हीआयपी बे आणि ईव्ही चार्जिंग पॉइंट्स असतील. नवीन टर्मिनस हे पश्चिम एक्स्प्रेस हायवेशी जोडलेले असेल आणि जवळचे मेट्र्रो स्टेशन फक्त 500 मीटर अंतरावर आहे.