भूमिगत नाल्याची सफाई करताना कामगाराचा मृत्यू

 चार कामगारांवर नायर रुग्णालयात उपचार सुरु 

Updated: Mar 17, 2019, 11:50 AM IST
भूमिगत नाल्याची सफाई करताना कामगाराचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील नाना चौक परिसरात असणाऱ्या भूमिगत नाल्याची सफाई करताना एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. नाना चौकातील स्कायवॉक खाली असणाऱ्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरु असताना ही दुर्घटना घडली.  नाना चौक येथे झालेल्या या दुर्घटनेमध्ये चार कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर चार कामगारांवर नायर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं कळत आहे. 

पाईपलाईन दुरुस्तीसाठी राजेश निकम, उमेश पवार, शांताराम भाकटे, सुरेश पवार आणि बाळासाहेब भावरे हे कामगार खाली उतरले होते. मात्र गॅस पाईपलाईन फुटली आणि कामगार गुदमरले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत राजेश निकम यांचा मृत्यू झाला.