मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा...
शहरात थांबून थांबून पावसाची हजेरी असली, तरी मान्सून अजून मुंबईत दाखल झालेला नाही. मान्सून राज्याच्या राजधानीत दाखल होण्यासाठी
मुंबई : शहरात थांबून थांबून पावसाची हजेरी असली, तरी मान्सून अजून मुंबईत दाखल झालेला नाही. मान्सून राज्याच्या राजधानीत दाखल होण्यासाठी
अजूनही किमान 24 ते 48 तास लागतील असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय. गेल्यावर्षी मान्सून 20 जूनला मुंबईत मान्सून बरसला..तर 2015 मध्ये १२ जून आणि 2014 मध्ये १5 जूनला पावसानं मुंबईत हजेरी लावली होती.
यंदा खरंतरं केरळमध्ये मान्सूनचं आगमन नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच झालं. त्यामुळे राज्यातही तो लवकर येईल असं वाटलं होतं. पण पोषक हवामान नसल्यानं तळकोकणात येता येताच सात तारीख उजाडली.
त्यानंतर पुन्हा एकदा मान्सून रखडला असून अरबी समुद्र किना-यावर त्याची प्रगती समाधानकारक वेगानं होत नसल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. तिकडे पूर्वेकडून येणाऱ्या मान्सूनच्या पावसानं सांगली, सात-यात हजेरी लावल्याचं वेधशाळेचं म्हणणं आहे. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात बळीराजा चांगलाच सुखावलाय.