Mumbra Local Accident: अन् लेकरु पोरकं झालं! GRP कर्मचाऱ्याला लेकाची भेट घेण्याआधीच मृत्यूने गाठलं

बापाचं कर्तव्य निभावण्यासाठी नाईट शिफ्ट संपवून निघालेल्या GRP कर्मचाऱ्याचा मृत्यू

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 9, 2025, 09:06 PM IST
Mumbra Local Accident: अन् लेकरु पोरकं झालं! GRP कर्मचाऱ्याला लेकाची भेट घेण्याआधीच मृत्यूने गाठलं

बापाचं कर्तव्य निभावण्यासाठी नाईट शिफ्ट संपवून निघालेल्या GRP कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईची सकाळ ही रेल्वे अपघाताच्या बातमीने झाली. मुंब्रा येथील रेल्वे अपघातात 4 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या अपघातात एका बापाचा दुर्दैवी अंत झाला आहे. 

मुंब्रा येथील रेल्वे अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा बाप आपल्या बाळाच्या ओढीने नाईट शिफ्ट करुन घरी चालला होता. तेव्हा रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय जीआरपी कर्मचाऱ्याचं नाव विक्की मुखदल असं आहे. विक्कीच्या अपघाती निधनाने मुख्यदल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका बापाची आणि बाळाची भेट अर्धवट राहिली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस

दुर्दैवी बाब म्हणजे 7 जून रोजीच विक्की यांचा वाढदिवस झाला होती. आणि दोन दिवसांनी त्यांना मृत्यूने गाठलं. विक्की मुख्यदल कल्याणच्या लोकग्राम परिसरातील सिंधू इमारतीत राहत होते. गेल्या चार वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या विक्की यांचं लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा देखील आहे. आपण चांगला शेजारी गमावल्याचं दुःख सिंधू इमारतीमधील इतर रहिवाशी करत असल्याच म्हटलं जात आहे. 

मुलाच्या वाढदिवसाअगोदरच... 

धक्कादायक बाब म्हणजे विक्की मुख्यदल यांच्या कुटुंबासाठी जून महिना आनंदाचा होता. पण या घटनेनंतर हा महिना अत्यंत वाईट ठरला. 17 जूनला विक्की यांच्या प्रणयचा पहिला वाढदिवस. मुलाच्या वाढदिवसाचं या दाम्पत्यांनी खूप नियोजन केलं होतं. पण विकी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करु शकला नाही. हे दुःख मुख्यदल कुटुंबासाठी सर्वात मोठं आहे.  

रेल्वे मंत्रालयाचे महत्त्वाचे निर्णय 

मुंबईतील आजच्या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने तातडीची पावले उचलली आहेत. यामध्ये  रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी यांची ICF टीमसोबत तातडीची बैठक घेतली. मुंबईतील नॉन-एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याच्या सुविधेवर निर्णय घेण्यासाठी सविस्तर चर्चा झाली आहे. मुख्य अडचण — नॉन-एसी डब्यांमध्ये दरवाजे बंद झाल्यास वायुवीजनाचा (ventilation) अभाव व घुसमट होऊ शकते. यावर उपाय म्हणून नव्या नॉन-एसी लोकल डब्यांची नवी रचना तयार करण्यात येणार आहेत. 

तीन महत्त्वाचे डिझाईन बदल:

दरवाज्यांमध्ये लव्हर्स (Louvres) असतील जे वायुप्रवाह कायम ठेवतील. 

डब्यांच्या छतावर ताजी हवा खेचण्यासाठी वायुवीजन यंत्रणा (Roof mounted ventilation units)

डब्यांमध्ये व्हेस्टिब्यूल्स असतील जेणेकरून प्रवासी एक डब्यातून दुसऱ्यात सहज जाऊन गर्दीचा समतोल राखू शकतील

या नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार असून  चाचणीनंतर जानेवारी 2026 पासून सेवेत येईल अशी माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त, मुंबईसाठी 238 एसी लोकल ट्रेन तयार करण्यात येत आहेत.