COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : नाट्यपरिषद निवडणूकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. शिवसेनेकडुन अभिनेता अमोल कोल्हे आणि प्रसाद कांबळी यांच्यामध्ये कोण विजयी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण यावरून पडदा उठला आहे. नुकत्याच लागलेल्या निकालात आपलं पॅनेलचे प्रसाद कांबळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवीन अध्यक्ष निवडले गेले आहेत. त्यामुळे २०१८ ते २०२३ पर्यंत प्रसाद कांबळी हेच अध्यक्ष राहणार आहेत. आता नव्या कार्यकारिणीमध्ये डॉ.गिरीश ओक यांची उपाध्यक्षपदी तर अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रमुख कार्यवाह म्हणून निवड झाली आहे


अमोल कोल्हे यांचा पराभव 


नाट्य परिषद निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उभे राहिलेल्या अमोल कोल्हे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.


कार्यकारणी पुढीलप्रमाणे


- प्रमुख कार्यवाह 
शरद पोंक्षे 
- कोषाध्यक्ष 
जगनाथ चितळे 
- उपाध्यक्ष (उपक्रम )
नरेश गडेकर 
- उपाध्यक्ष (प्रशासन )
गिरीश ओक 
- कार्यकरणी सदस्य 
मधुरा वेलणकर 
शंकर निमकर 
भरत जाधव 
अविनाश नारकर 
शेखर बेंद्रे 
राजन भिसे 
मंगेश कदम 
संदीप जंगम 
आनंद खरवस 
उज्वल देशमुख 
गिरीश महाजन असे 11 कार्यकारणी समिती निवडून आले 
- सहकार्यवाह 
3 जण निवडून आले 
सुनील ढगे 
सतीश लोटके 
अशोक ढेरे