)
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : (Navi Mumbai crime news ) नवी मुंबईमधील उलवे इथं असणाऱ्या जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबतील पाच जणांनी विषरी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार हे धक्कादायक वृत्त समोर आलं. सदर घटनेमध्ये एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे तर, चार जणांना उपचापचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भाडेकरू म्हणून वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबाने दोन-तीन दिवसापासून घरचा दरवाजा उघडलाच नव्हता. काही दादही आतून दिली जात नव्हती, त्यामुळे घरमलकाने दरवाजा अग्निशमन दलाच्या मदतीने उघडला असता. दार उघडलं असताक्षणी समोर दिसलेलं दृश्य पाहून सारेच हादरले. कारण घरामध्ये संतोष बिरा लूहार वय 22 वर्ष , रमेश बिरा लोहार वय 23 वर्ष त्याची पत्नी बसंती आणि मुलगा आयुष वय पाच वर्ष, आर्यन वय दोन वर्ष हे सर्वजण बेशुद्धावस्थे आढळले.
घटनास्थळी या सर्वांना अशा अवस्थेत पाहिलं असता तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान संतोष यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, चार जणांवर उपचार सुरू असून, दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे. सदर आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार हे कुटुंब मुळचं नेपाळचं रहिवासी असल्याचं कळत असून, आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवी मुंबईतील कोपरखैरणे विभागात हुल्लडबाज तरुणांची दिवाळी अनेकांच्या संतापाचं कारण ठरली. रस्त्यावर नागरिकांच्या जीवितास हानी होईल अश्या पद्धतीनं इथं फटाके फोडण्यात आले. रस्त्यावर रॉकेट आडवे सोडण्यात आले, हातातून फेकून देत सोडण्यात आले. तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे आग लागण्यासारखी दुर्घटना देखील होऊ शकली असती, हे पाहता कोपरखैरणे पोलीस अशा हुल्लडबाज तरुणांची तक्रार दाखल करण्यात आली होती.
घटना कुठे आणि कधी घडली?
ही घटना नवी मुंबईतील उलवे, जावळे गावात भाड्याच्या घरात घडली. कुटुंबाने दोन-तीन दिवसांपूर्वी (अंदाजे 21-22 ऑक्टोबर) विषरी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोण कोण या कुटुंबातील सदस्य होते?
कुटुंबातील पाच सदस्य: संतोष बिरा लोहार (22 वर्षे), रमेश बिरा लोहार (23 वर्षे), रमेशची पत्नी बसंती, आणि त्यांचे दोन मुले आयुष (5 वर्षे) व आर्यन (2 वर्षे).
घटनेची नेमकी माहिती काय आहे?
कुटुंबाने घराचा दरवाजा दोन-तीन दिवस बंद ठेवला होता आणि आतून प्रतिसाद देत नव्हते. घरमालकाने शंका बाळगून अग्निशमन दल बोलावले. दरवाजा उघडताच सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले.