)
Navi Mumbai International Airport: अतिशय झपाट्यानं विकासाच्या आणि आधुनिक शहराच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईत आता आणखी एक कमाल गोष्ट घडली आहे. याच नवी मुंबईच्या शिरपेचात आज मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. हे बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे प्रवासी सेवेसाठी खुलं झालं आहे. बंगळुरुवरुन आलेलं पहिलं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरलं आणि इथूनच एका नव्या पर्वाची नांदीसुद्धा झाली.
ख्रिसमसचं औचित्य साधत या हे विमानतळ नियमित वाहतुकीसाठी सुरू झालं आणि पहिल्या विमानातून आलेल्या प्रवाशांचं इथं स्वागतही करण्यात आलं. यावेळी प्रवाशांचा उत्साहसुद्धा पाहण्याजोगा होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळं मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. पहिलं विमान लँड होण्यामागोमाग या विमानतळावरुन पहिलं उड्डाण हैदराबादसाठी रवाना झालं असल्याचं सांगण्यात आलं. सुरुवातीच्या टप्प्यात इंडिगो (Indigo), एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) आणि आकासा एअर (Akasa Air) या कंपन्यांमार्फत देशातील 16 प्रमुख शहरांशी थेट संपर्क जोडला जाणार आहे. पहिल्याच दिवशी या विमानतळावरून सुमारे 4000 प्रवासी या विमानतळाचा लाभ घेतील अशी माहिती समोर येत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या धावपट्टीवर पहिलं विमान 25 डिसेंबर, गुरुवारी सकाळी 8 वाजता लँड झालं. इंडिगोचे 6 ई 460 हे विमान बंगळूरूहून इथं दाखल झालं. ज्यानंतर सकाळी 8.40 वाजता इंडिगोचंत 6 ई 882 हे विमान हैदराबादकडे रवाना झालं.
#WATCH | Maharashtra: Navi Mumbai International Airport to begin operations today
— ANI (@ANI) December 25, 2025
A passenger, Ram Prasad, says, "We came from Bangalore, and we booked this trip specifically to explore the Navi Mumbai airport.... First of all, I thank Mr Adani. He came and welcomed all the… https://t.co/1zXMD15il4 pic.twitter.com/R1yAOQFf5t
Spectacular drone show featuring 1,515 drones marks the launch of operations at Navi Mumbai International Airport
— WION (@WIONews) December 24, 2025
Take a look!
(Source: ANI) pic.twitter.com/FL9hUmIPEf
The first commercial flight landed at Navi Mumbai International Airport.
— Siraj Noorani (@sirajnoorani) December 25, 2025
An #IndiGo flight from #Bengaluru landed in #NaviMumbai, marking the first landing at the airport. pic.twitter.com/cxdVQQU22Q
दरम्यान, विमानतळ प्रवासी सेवेसाठी सुरू करण्याच्या पूर्वसंध्येला इथं तब्बल दीड हजारांहून अधिक ड्रोनद्वारे आकर्षक शो आयोजित करण्यात आला होता. विमानतळाची संकल्पना आणि भव्यतेवर आधारित हे सादरीकरण लक्षवेधी ठरलं. पहिल्या टप्प्यात या विमानतळाची दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.5 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता असणार आहे, त्यामुळं आता असंख्य प्रवाशांसाठी आणि नवी मुंबईसाठी हे विमानतळ येत्या काळात नेमका कसा बदल घडवून आणतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.