दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई :  मनसेतून शिवसेनेत गेलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसंच सहा नगरसवेकांच्या सह्या असलेलं पत्रही प्रसिद्ध केलंय. त्यामुळं हे सहा नगरसेवक मनसेत परतणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. 


या सहा नगरसेवकांपैकी दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम आणि हर्षला मोरे हे चार नगरसेवक मनसेत परतणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र हे सर्व शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. 


 


सहा नगरसेवकांंचे पत्र 



मनसेत पुन्हा जाणार होते... 


 शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारत राजकीय भूकंप घडवून आणला होता.  त्याला क्षय देण्यासाठी मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त सकाळी आले होते. पण मनसेच्या ४ नगरसेवकांची घरवापसी होणार नसून ते सेनेतच राहणार आहे. य 


भाजपला शह देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक फोडले होते. मात्र, मनसेच्या चार नगरसेवकांची घरवापरसी होत आहे, असे मनसेच्या गोटातून समजले होते.  यापैकी दोन नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली.


राज ठाकरेंशी फोनवरून चर्चा 


शिवसेनेत गेलेल्या ४ नगरसेवकांची पुन्हा मनसेत घरवापसी होण्याची चिन्ह आहेत. शिवाजी पार्क परिसरात यातील दोन नगरसेवक मनसे नेत्यांना भेटले. त्यावेळी या दोन नगरसेवकांनी राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केली. त्यामुळे शिवबंधन धागा बांधलेल्यापैकी दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे हे मनसेत पुन्हा दाखल होणार आहेत. तसेच यापैकीच दोन नगरसेवकांनी राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून सकाळी देण्यात आली होती. पण लांडे यांच्या पत्राने पुन्हा सकाळच्या घडामोडींवर पडदा पडला आहे.