Raj Thackeray Aggressive Questions: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची मागणी राज ठाकरेंनी केली. यावेळेस राज ठाकरेंनी मतदार याद्यांबरोबरच अनेक विषयांना हात घालताना थेट निवडणूक आयुक्तांना त्यांच्या तोंड्यावर अनेक गोष्टी सुनावल्या.
"निवडणुका लढवतात राजकीय पक्ष मग राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही? असा सवाल राज ठाकरेंनी बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित केला. या निवडणुका राजकीय पक्ष लढवतो. निवडणूक आयोग मतदार नोंदणी करता मग ती यादी राजकीय पक्षांना का दाखवली जात नाही? एकच नाव चारपाच ठिकाणी. ते सुधारण्याचे काम तुमचे व आमचे आहे. ही लपवाछपवी कुणासाठी सुरू आहे?" असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? असा प्रश्नही राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला. "आम्ही, आम्ही करू नका. काल त्यांनी तुमच्यावर ढकलले आहे, आता तसं नका करू," असा सल्लाही राज यांनी दिला.
"आठ दिवसांची फक्त मुदत देता. निवडणुका कशा लढवायच्या सांगा क्लिष्ट प्रश्न नाहीत. आमचा मतदारांशी संबंध येतो, तुमचा नाही. ते आम्हाला मतदान करतात. ही पारदर्शकता आहे का? 2022 ला बेसावध राहिलो. सगळं व्यवस्थित केल्याशिवाय निवडणुका घेता नाही येणार. इतकी वर्षे झाली आता नाही होणार," अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी घेतली. "सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका," अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.
नक्की वाचा >> ...तर मुंबईत ठाकरेच? फडणवीस, शिंदे, अजित पवारांना घाम फोडणारी आकडेवारी एकदा पाहाच
"सत्तेतल्या तीन पक्षांसाठी तुम्ही काम नाही करत, सर्व पक्षांसाठी काम करता," असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी, "तुम्ही हुकूमशाही व आम्ही लोकशाही पाळणार का?" असा सवाल केला. "आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. मुलीचे वय 134 व वडिलांचे 40... मग कोणी कोणाला काढले?" असं राज यांनी चिडून विचारलं. "तुम्हीच सगळं ठरवणार. निवडणूक आम्ही लढवतो व तुम्ही निवडणूक कंडक्ट करता," अशी आठवण राज यांनी करुन दिली.
राजकीय पक्षांचे प्रश्न स्पष्ट झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. निवडणूक कार्यक्रम रद्द करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. "बाळासाहेब थोरात 8 टर्म 80 ते 90 हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. "याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू," अशी मागणी राज ठाकरेंनी केली. तसेच, "निवडणूक पुढे ढकला," असंही राज म्हणाले. त्यानंतर, "सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
नक्की वाचा >> 4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. 'त्या' रात्री नेमकं घडलं काय?
उद्धव ठाकरेंनी व्हीव्हीपॅटचा विषय उपस्थित केला असता, बॅलेट पेपरवर वेळ लागतो असं निवडणूक आयोगाने म्हटलं. बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे?" असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला.
"5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका. तुम्ही राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय," असं राज ठाकरे म्हणाले.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(18.4 ov) 125
|
VS |
AUS
126/6(13.2 ov)
|
| Australia beat India by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.