What Uddhav Thackeray Said To Election Commissioner: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीमध्ये ठाकरे बंधुंनी अगदी आक्रमकपणे आपल्या भूमिका अधिकाऱ्यासमोर ठेवल्या. या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना मतदार यादीपासून ते व्हीव्हीपॅटसंदर्भात अनेक प्रश्न विचारले.
"मतदार यादीची जबाबदारी नेमकी कुणाची, राज्य की केंद्रीय निवडणूक आयोगाची? पहिलं कोणाशी बोलू ते सांगा. दोघांपैकी नेमकी कुणाची जबाबदारी? दुबार, तिबार मतदार कसे नोंदवले जातात?," अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी आयोगाच्या कारभारासंदर्भात आपला संताप व्यक्त केला.
"चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही. त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता? डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा >> ..मग कोणी कोणाला काढले? राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्याने अधिकारी थक्क; 'मतदार याद्या..'
महाराष्ट्राच्या निवडणुक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या प्रश्नांवर बोलताना, "मागची यादी आम्ही वापरत आहोत. 1 जुलै ही तारीख निश्चित केली होती.यादी तीच वापरत असल्याने नावे डिलीट करणे, बदलणे ही आमच्या अधिकारात नाही," असं उत्तर दिलं.
"तुमची यंत्रणा सदोष आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी, "तुमची यंत्रणा सज्ज नाही. अनेक दुबार मतदार आहेत," असं म्हटलं.
नक्की वाचा >> ...तर मुंबईत ठाकरेच? फडणवीस, शिंदे, अजित पवारांना घाम फोडणारी आकडेवारी एकदा पाहाच
"राज्य निवडणूक आयोगाला कशी काय तशीच यादी दिली गेली? जुन्या यादीतील घोळ निस्तरा मगच ती यादी द्यायला हवी होती. दोष दाखवूनही ते मान्य नाही केलेत. सदोष यादी दुरुस्त करून मग राज्य निवडणूक आयोगाला यादी द्या. काल मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जो मागे घ्यावा," असं ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अनिल देसाई म्हणाले.
"व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही. म्हणजे तुम्ही सर्व पुरावे नष्ट कराल. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
नक्की वाचा >> 4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. 'त्या' रात्री नेमकं घडलं काय?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडताना, "बोगस मतदान झाल्याचे प्रकार उघडकीस आणूनही पुढे काहीच घडले नाही. नंतरही ही नावे वगळली नाहीत. 1 जुलैला तीच यादी समोर आलीये. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी आहेत," असं अधिकाऱ्यांना सांगितलं.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.