कोणत्या देशाच्या दबावामुळे तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला नाही, मोदींचा थेट सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आरोपांवर काँग्रेसनं पलटवार केला आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 8, 2025, 09:43 PM IST
कोणत्या देशाच्या दबावामुळे तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला नाही, मोदींचा थेट सवाल

स्वाती नाईक, झी 24 तास नवी मुंबई : ऑपरेशन सिंदूरवरून सवाल उपस्थित करणा-या काँग्रेसवर मोदींनी गंभीर आरोप केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार होतं.. मात्र काँग्रेस सरकारनं दुस-या देशाच्या दबावामुळे पाकिस्तानवर हल्ला केला नाही.. कोणत्या देशाच्या दबावामुळे तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला नाही याचं उत्तर काँग्रेसनं द्यावं असं मोदी म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. मुंबईच्या विकासावर बोलताना त्यांनी विरोधकांच्या कार्यकाळातील कारभाराचा खरपूस समाचार घेतला. सत्ता ही काँग्रेसची प्राथमिकता होती. जनसेवेला काँग्रेसनं कधीच प्राथमिकता दिली नाही असा आरोप मोदींनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात मेट्रो-3चं कामच बंद पाडल्याचा आरोप मोदींनी केला आहे. मुंबईकरांती गैरसोय करण्याचं पाप महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

मोदींनी केलेल्या आरोपांवर काँग्रेसनं पलटवार केला आहे.  मोदींनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सुरक्षेचा आणि सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करत थेट काँग्रेसवर बोचरी टीका केली. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य तयार होतं. पण त्यांना हल्ला करण्यापासून तत्कालिन काँग्रेस सरकारनं रोखल्याचा आरोपही मोदींनी केलाय. पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून तत्कालिन काँग्रेस सरकारवर कुणाचा दबाव होता असा सवालही मोदींनी केला आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना काँग्रेसनं सडेतोड उत्तर दिलं आहे. मोदींनी केलेले आरोप काँग्रेसनं फेटाळून लावलेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळ उद्घाटन सोहळ्यात काँग्रेसवर आरोप करुन आगामी महापालिका निवडणुकीचा शंखनाद केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्याअगोदरच सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता सुरु झाल्याचे हे संकेत मानले जात आहेत. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More