रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली :  राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात दिवसभर राडा पाहायला मिळाला. या संपूर्ण वादावरुन राजकारण ढवळून निघालं. या वादानंतर अखेर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. या अटकेनंतर राज्याचा प्रवास हा राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने निघाल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील या सर्व राड्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेने जोर धरला आहे. (president rule may apply in maharashtra after navneet rana ravi rana controversy against shivsena)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी वेळ आलीये, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रपती राजवटीसाठी शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खुलं आव्हान दिलंय. 



राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक हिसंक आंदोलनं झाली. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेला आणखी उधाण आलंय. दरम्यान आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट


1) 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980


2) 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014


3) 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019.