मुंबईकरांच्या अडचणी वाढणार! आज 'या' मार्गावरील गाड्या रद्द; पाहा संपूर्ण यादी

Railway Major Block: चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान वानखेडे फूट ओव्हर ब्रिज (दक्षिण) च्या मुख्य गर्डर्सचे काम सुरू करण्यासाठी 19 आणि 20 एप्रिल म्हणजेच शनिवार, रविवारी मध्यरात्री 1.15 ते 4.15 पर्यंत 3 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 20, 2025, 10:45 AM IST
मुंबईकरांच्या अडचणी वाढणार! आज 'या' मार्गावरील गाड्या रद्द; पाहा संपूर्ण यादी
मुंबई लोकल

Railway Major Block: तुम्ही मुंबई लोकने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कारण शनिवार, रविवार अनेक लोकल रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी तुम्हाला मुंबई लोकलचं वेळापत्रक माहिती असायला हवं. ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान वानखेडे फूट ओव्हर ब्रिज (दक्षिण) च्या मुख्य गर्डर्सचे काम सुरू करण्यासाठी 19 आणि 20 एप्रिल म्हणजेच शनिवार, रविवारी मध्यरात्री 1.15 ते 4.15 पर्यंत 3 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द होणार आहेत. काही गाड्यांच्या मार्गांवरही परिणाम होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

या गाड्या करण्यात आल्या रद्द 

19 एप्रिल रोजी रात्री 8.50 वाजता बोरिवलीहून सुटणारी ट्रेन क्रमांक 90898 बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द राहील. 20 एप्रिल रोजी चर्चगेटहून 4.38 वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक 90019 चर्चगेट-बोरिवली लोकल रद्द राहील.या गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. 20 एप्रिल रोजी 0.10 वाजता बोरिवलीहून निघणारी ट्रेन क्र. 91014 बोरिवली - चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

19 एप्रिल रोजी 23.49 वाजता विरारहून निघणारी ट्रेन क्र.91018 विरार - चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.20 एप्रिल रोजी 0.30 वाजता बोरिवलीहून निघणारी ट्रेन क्र.91020 बोरिवली-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. 20 एप्रिल रोजी 0.5 वाजता विरारहून निघणारी ट्रेन क्र.91024 विरार - चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. 20 एप्रिल रोजी चर्चगेटहून 4.15 वाजता सुटणारी आणि मुंबई सेंट्रलहून 4.25 वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक 90011 चर्चगेट - विरार पहिली लोकल चर्चगेट - मुंबई सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.

20 एप्रिल रोजी सकाळी 4.18 वाजता चर्चगेटहून सुटणारी ट्रेन क्रमांक 90015 चर्चगेट - बोरिवली लोकल चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येईल. 19 एप्रिल रोजी विरारहून रात्री 23.30 वाजता सुटणारी विरार - चर्चगेट लोकल ही ट्रेन वेळापत्रकानुसार 1.10 वाजता चर्चगेटला पोहोचेल. 19 एप्रिल रोजी विरार ते चर्चगेट अशी धावणारी ही शेवटची लोकल ट्रेन असणार आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More