रेल्वेत नोकरी हवी? मुंबईतील 4 जणांना नियुक्तिपत्रं, 3 महिने प्रशिक्षण अन् पगाराचे आमिष दाखवून 22 लाखांचा गंडा

रेल्वेमध्ये नोकरी देतो म्हणून मुंबईतील चार जणांना तब्बल 22.45 लाखांचा गंडा घालण्यात आला. पोलिसांनी पाटण्यामधील दोघांना अटक केली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 3, 2026, 07:16 PM IST
रेल्वेत नोकरी हवी? मुंबईतील 4 जणांना नियुक्तिपत्रं, 3 महिने प्रशिक्षण अन् पगाराचे आमिष दाखवून 22 लाखांचा गंडा

मुंबईत रेल्वे नोकरी घोटाळा प्रकरणात धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील चार जणांना रेल्वे नोकरीसाठी नियुक्तिपत्रं, 3 महिने प्रशिक्षण अन् पगाराचे आमिष दाखवून 22 लाखांचा गंडा घालण्यात आला. 

Add Zee News as a Preferred Source

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंग्यामधील 49 वर्षीय केटरर यांना 2021 मध्ये एका व्यक्तीनी संपर्क केला. हा व्यक्ती एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्याच्या भाचीच्या ओळखीचा होता. आरोपीने असा दावा केला की, तो म्हणाला की त्याचे एवढं संपर्क आहेत की कोणतीही परीक्षा न देता भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची नोकरी त्यांना देण्यास मदत करु शकतो. 

त्यानंतर त्यांची ओळख दुसऱ्या पाटण्यामधील व्यक्तीशी करण्यात आली. त्या व्यक्तीने नोकरीसाठी ₹6.23 लाखांची व्यवस्था करा असं सांगितलं. ऑक्टोबर 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान, त्यांनी या लोकांना बँक खात्यात हप्त्यांमध्ये पैसे दिले. काही भाग रोख स्वरूपात देखील दिलेत. 

परीक्षा न देतात नियुक्त्या आणि प्रशिक्षण अन् पगार...

पोलिसांनी सांगितलं की, मांटुग्यातील तक्रारदाराला पूर्व मध्य रेल्वे, दानापूर विभागाकडून पोस्टाने नियुक्ती पत्रदेखील आले होते. त्यानंतर तो फेब्रुवारी 2022 मध्ये पाटणा इथे गेला असता त्याला रेल्वे ओळखपत्र देखील देण्यात आलं. तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामध्ये ट्रेनचे वेळापत्रक त्याला शिकवण्यात आले. त्याला सांगण्यात आले होते की, प्रशिक्षण कालावधीत त्याला अर्धा पगार मिळेल आणि दरमहा त्याच्या बँक खात्यात 11,000 रुपये जमा करण्यात येईल.

नंतर, त्याला एका जीमेल आयडीवरून एक ईमेल आला ज्यामध्ये तिला नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे पोस्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, कोणतेही अधिकृत जॉइनिंग लेटर मिळाले नाही.

नोकरी खरी आहे याची खात्री पटल्यानंतर, तक्रारदाराने तीन माजी सहकाऱ्यांना रिक्त जागेबद्दल सांगितलं. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी आरोपींना नियुक्तीपत्रे आणि इतर कागदपत्रे दाखवून अनुक्रमे ₹6.50 लाख, ₹3 लाख आणि ₹6.72 लाख दिले. त्यांना अशाच प्रकारचे प्रशिक्षण सत्र आणि बनावट कागदपत्रे देखील दिली.

 

हेसुद्धा वाचा - मुंबई विमानतळावरून 350 विमानं रद्द; इराण-इस्रायल युद्धादरम्यान लाखो प्रवासी अडकले

 

पण त्यानंतर त्यांना पोस्टिंग आले नाही, त्यानंतर त्यांनी आरोपींना संपर्क साधण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या फोन लागला नाही, मग त्यांना लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

मग मुंबई पोलिसांनी बिहारमधील पटनामधील रहिवासी अभिनव कुमार अजय कुमार पाठक आणि राजू अशोक सिंग उर्फ ​​आरके सिंग या दोन आरोपींविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रुप डी जॉब म्हणजे काय?

भारतीय रेल्वेमधील ग्रुप डी पदे, आता लेव्हल 1 पद म्हणून वर्गीकृत करण्यात येते. ही एंट्री-लेव्हल, नॉन-राजपत्रित नोकऱ्या आहेत. ज्यात ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, पॉइंट्समन, पोर्टर आणि हॉस्पिटल अटेंडंट यासारखी पोस्टिंग मिळते.

रेल्वे भरती मंडळाकडून केंद्रीय पातळीवर संगणक-आधारित चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यासारख्या निश्चित प्रक्रियेद्वारे भरती केली जाते. परीक्षेशिवाय थेट नियुक्तीची तरतूद नाही.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More