'मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि .......' - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चारकोपला मनसेच्या शाखेचं उद्धघाटन केलं, त्यावेळी ते व्यासपीठावर आले, आणि तिथून फक्त एका वाक्यात त्यांनी भाषण केलं.

Updated: Mar 5, 2022, 10:23 PM IST
'मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि .......' -  राज ठाकरे title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चारकोपला मनसेच्या शाखेचं उद्धघाटन केलं, त्यावेळी ते व्यासपीठावर आले, आणि तिथून फक्त एका वाक्यात त्यांनी भाषण केलं. मी तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी वर आलो आहे, तुम्हाला पाहायला आलो आहे, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे पाहून आनंद झाला आहे, धन्यवाद असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी भाषणात राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि कशी आहे ते  यंदा निश्चय करा, बाकीच्या पक्षांना हाणायचं म्हणजे हाणायचं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तर यापूर्वी आणखी एका ठिकाणी शाखा उद्धघाटनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, प्रत्येक शाखेत मी दोन ओळी लिहून पाठवणार आहे. कारभार असा करावा की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता काम नये, असं शिवरायांच्या पत्रातील वाक्य प्रत्येक शाखेत मनसे लावणार आहे. शाखा या लोकांच्या सेवेसाठी आहे, लोकांना लुटण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी नाहीत, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.