'.... ती त्यांची खरी समाधी', राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचा 'तो' किस्सा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त षण्मुखानंद येथे कार्यक्रमात राज ठाकरे यांनी व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 23, 2026, 08:56 PM IST
'.... ती त्यांची खरी समाधी', राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचा 'तो' किस्सा

मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्रित आल्याचे दिसून आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. 

Add Zee News as a Preferred Source

राज ठाकरे यावेळी म्हणाले की, त्या व्यक्तीला कसं पाहायचं किंवा कसं मांडायचं हा आजही माझ्यासमोर प्रश्न आहे. काका म्हणून मांडायचं, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं की, हिंदूहृदयसम्राट म्हणून मांडायचं हा प्रश्न आहे. 

पुढे राज ठाकरे म्हणाले की,  “बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्या शब्दात मांडू हे समजत नाही. जगात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी एकही कलाकार झाला नाही. बाळासाहेब ठाकरे देशातील सर्व राजकारण्यांपेक्षा वेगळे आहेत. बाळासाहेबांचे खूप किस्से मला सांगायचे आहेत. पण सांगता येत नाही कारण, भाषा. तुम्हाला माहित नाहीत, ते काय होते ते?

बाहेर एवढं वादळ चालू असायचं. कुठे दंगली चालू असायच्या तर कुठे राडे असायचे तर कुठे आंदोलन, तर कधी जेल... तर कुणावर काय संकट येईल. बाहेर काहीही चालू असताना हा माणूस जेव्हा व्यंगचित्र काढायला बसायचा तेव्हा कधीच मारकाम चालू नसायचं. त्या व्यंगचित्रामध्ये मला आजही मारकाम दिसलं नाही. मी बारकाईने पाहिलं त्यांनी कधीच द्या कसं तरी काढायचं आणि द्या पटकनं असं नसायचं. समाधी लागली म्हणतात ना ती अशी... ती व्यंगचित्र नव्हती तर ती एक समाधी होती. त्या माणसाची समाधी. 

राज ठाकरे पुढे काय म्हणाले?

“बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्या शब्दात मांडू हे समजत नाही. जगात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी एकही कलाकार झाला नाही. बाळासाहेब ठाकरे देशातील सर्व राजकारण्यांपेक्षा वेगळे आहेत. आजची राजकारणाची परिस्थिती पाहिली की, आज मला वाटत की बाळासाहेब नाहीयेत ते बरे आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्याला किती त्रास झाला असता? मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा ते पक्ष सोडणे नव्हते, तर घर सोडणे होते. 20 वर्षांमध्ये मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या.”

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More