रतन टाटांनी 500 कोटींची संपत्ती ज्यांना दिली ते मोहिनी दत्ता आहे तरी कोण?

Ratan Tata Death Anniversary: मोहिनी मोहन दत्ता यांना रतन टाटा यांनी 500 कोटींची संपत्ती का दिली? याची चर्चा रंगली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 9, 2025, 01:03 PM IST
रतन टाटांनी 500 कोटींची संपत्ती ज्यांना दिली ते मोहिनी दत्ता आहे तरी कोण?
ratan tata death anniversary Who is Mohini Mohan Dutta Ratan Tata Will and 500 Crore rupees

Ratan Tata Death Anniversary: रतन टाटा यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूपत्राची चर्चा होतेय. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यपत्रात असलेल्या नावांची चांगलीच चर्चा होत होती. त्यातील एका नाव म्हणजे मोहिनी मोहन दत्ता. मोहिनी यांच्या नावे मृत्यूपत्रात मोठी रक्कम लिहिण्यात आली होती. त्यांच्या नावे तब्बल 500 कोटींची रक्कम करण्यात आली होती. त्यानंतर मोहिनी दत्ता नेमके आहेत तरी कोण? याची चर्चा रंगली होती. 

Add Zee News as a Preferred Source

काही वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जमशेदपूरच्या व्यापारी मोहिनी मोहन दत्ता यांना 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. अशावेळी मोहिनी मोहन दत्ता नेमके कोण आणि त्यांना इतकी रक्कम का देण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. 

कोण आहे मोहिनी मोहन दत्ता?

मोहिनी मोहन दत्ता रतन टाटा यांना पहिल्यांदा 1960च्या दशकात जमशेदपूरमध्ये भेटले होते होत्या. तेव्हा रतन टाटा 24 वर्षांचे होते व टाटा ग्रुपच्या वेगळ्या वाटा शोधत होते. टाटांच्या भेटीनंतर दत्ता यांचे आयुष्यच बदलून गेले ते त्यांच्या खूप जवळचे मानले जाऊ लागले. 

काही रिपोर्टनुसार, दत्ता फक्त त्यांचे सहकारी नव्हते तर ते स्वतःला त्यांचा मानलेला मुलगा देखील मानत होते. ऑक्टोबर 2024 रोजी टाटांच्या अत्यंसंस्कारावेळी दत्ता यांनी म्हटलं होतं की, पहिल्यांदा आम्ही जमशेदपूरमध्ये भेटलो होते. तेव्हा टाटा 24 वर्षांचे होते आणि त्यांनी माझी मदत गेली आणि मला पुढे जाण्यास मदत केली.

दत्ता यांचा व्यापार टाटा ग्रुपसोबत जोडला गेला आहे. ताज ग्रुपसोबत करियर सुरू केल्यानंतर त्यांनी स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सीची स्थापना केली. ज्याचा 2013मध्ये ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये एक विभाग ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झालं आहे. टाटा कॅपिटलने अधिग्रहण केल्यानंतर ते थॉमस कुकला विकण्याच्या आधी टाटा इंडस्ट्रीजवळ या व्यवसायाची 80 टक्के भागीदारी होती. दत्ता या रीब्रांडेड टीसी ट्रॅव्हल सर्विसेजमध्ये डायरेक्ट होत्या. त्यांच्याकडे टाटा समुहाच्या कंपन्यांचे अनेक शेअर्स आहेत. ज्यात टाटा कॅपिटलदेखील आहे. 

FAQ 

प्रश्न १: रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव का आणि किती रक्कमसह आहे?

उत्तर: रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांना त्यांच्या जवळच्या नात्यामुळे आणि दीर्घकाळाच्या सहकार्यामुळे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम त्यांच्या योगदान आणि नात्याची ओळख म्हणून दिली गेली आहे.

प्रश्न २: मोहिनी मोहन दत्ता कोण आहेत?

उत्तर: मोहिनी मोहन दत्ता जमशेदपूरच्या एक प्रसिद्ध व्यापारी महिल आहेत. त्यांचा व्यवसाय टाटा ग्रुपशी जोडलेला आहे आणि त्या टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये शेअर्सधारक आहेत, ज्यात टाटा कॅपिटलचा समावेश आहे.

प्रश्न ३: मोहिनी मोहन दत्ता आणि रतन टाटा यांची भेट कधी आणि कशी झाली?

उत्तर: मोहिनी मोहन दत्ता यांची रतन टाटा यांच्याशी पहिली भेट १९६० च्या दशकात जमशेदपूरमध्ये झाली. तेव्हा रतन टाटा फक्त २४ वर्षांचे होते आणि ते टाटा ग्रुपच्या वेगळ्या संधी शोधत होते. या भेटीनंतर त्यांचे नाते खूप जवळचे झाले.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More