SSR प्रकरण:रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी, भाऊ आणि वडीलही उपस्थित

रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी

Updated: Aug 7, 2020, 01:27 PM IST
SSR प्रकरण:रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी, भाऊ आणि वडीलही उपस्थित

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ईडीचा तपास तीव्र झाला आहे. रिया चक्रवर्तीची मुंबईतील ईडी कार्यालयात विचारपूस केली जात आहे. ईडी कार्यालयात जात असाताना तिच्यासोबत तिचा भाऊ आणि वडीलही हजर आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणाबाबत ईडीकडून रियाकडे चौकशी केली जाईल. रियाबरोबर ईडीची चौकशी 6 ते 8 तास चालू राहू शकते. रियावर सुशांतच्या खात्यातून 15 कोटी काढून घेतल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर हे आरोप केले आहेत.

रिया सुशांतच्या खात्यातून कोट्यावधींचा व्यवहार का करीत आहे हेही ईडीला जाणून घ्यायचे आहे. रियाच्या मालमत्तेशी संबंधित प्रश्न आणि त्यांच्याद्वारे केलेले व्यवहार ईडीकडून केले जातील. सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांचीही ईडीने चौकशी केली आहे. रियाच्या सीएलाही समन्स बजावले होते परंतु ते अद्याप ईडीसमोर हजर झाले नाहीत. रिया नंतर, ईडी तिच्या कुटुंबियांना समन्स देखील पाठवू शकते. ईडीने सुशांतच्या घरातील हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची चौकशी केली आहे.

रियाची खार (शिवालिक बिल्डर्स), मुंबई येथे एक मालमत्ता आहे. जी 85 लाखात खरेदी केली गेली. या मालमत्तेसाठी 25 लाखांचे डाउन पेमेंट केले गेले. त्याचवेळी 60 लाखांचे गृह कर्ज घेण्यात आले. 550 चौरस फूट फ्लॅट रियाच्या नावावर बुक झाला होता. दुसरी मालमत्ता रियाच्या वडिलांच्या नावाची आहे, ती 2012 मध्ये 60 लाख रुपयांमध्ये खरेदी केली गेली होती. 2016 मध्ये या मालमत्तेचे पजेशन पॅराडाइझ ग्रुप बिल्डरने दिले होते. ही मालमत्ता 1130 चौरस फूट आहे. जी उल्वे येथे आहे.

सुशांतच्या प्रकरणात आता सीबीआय चौकशी करीत आहे. तत्पूर्वी, मुंबई पोलिसांच्या तपासादरम्यान ईडीने तपास सुरू केला होता. रिया आणि तिचा भाऊ यांच्यामार्फत सुशांतसिंह राजपूतच्या बँक खात्यातून पैशांचा व्यवहार झाल्याचा ईडीचा संशय आहे.

सीएला रियाच्या आधी ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. परंतु मुसळधार पावसाचे कारण सांगत त्याने येण्यास नकार दिला आहे. रियाच्या आधी ईडीला सीएची चौकशी करायची होती. कारण रिया कुठे आणि किती पैसे खर्च करते याबद्दल सीएला सर्व माहिती असतं. पण आता सीए न आल्यास सर्व प्रश्न रियालाच विचारले जातील.

पटना येथे पोलिसात एफआयआर नोंदवताना सुशांतच्या वडिलांनी रियावर बरेच आरोप केले. त्यातील एक आरोप पैशांच्या व्यवहाराबाबत होता. त्यांनी दावा केला की, सुशांतच्या खात्यात 17 कोटी होती, त्यापैकी 15 कोटी गायब आहेत.