सैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट; हल्लेखोर अन् मोलकरीण दोघंही...; तितक्यात आला सैफ अन् झाला हल्ला

Saif Ali Khan Attacker Demands 1 Crore: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपली पत्नी करिना कपूर आणि दोन मुलांसह वांद्रे येथील इमारतीत वास्तव्यास आहे. 12 मजल्यांच्या इमारतीमधील चार माळ्यांवर त्यांचं अपार्टमेंट आहे.  

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2025, 08:22 PM IST
सैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट; हल्लेखोर अन् मोलकरीण दोघंही...; तितक्यात आला सैफ अन् झाला हल्ला

Saif Ali Khan Attacker Demands 1 Crore: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी घुसखोरी करत हल्लेखोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केलं. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. इमारतीमधील सीसीटीव्हीत तो कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, त्याला पकडण्यासाठी 10 टीम गठीत करण्यात आल्या आहेत. यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

हल्लेखोराकडून 1 कोटींची मागणी

सैफवर हल्ला करणारा आरोपी त्याच्या मोलकरणीवर धारदार शस्त्र ठेवून 1 कोटींची मागणी करत होता. मोलकरणीची आरडाओरड ऐकून सैफ अली खान बाहेर आला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. कशासाठी आला आहेस, काय पाहिजे? विचारले असता त्याने १ कोटींची मागणी केली. जोवर पैसै देत नाही तोवर कोणी घराबाहेर पडणार नाही असं आरोपीने काम करणाऱ्या महिलेला धमकावलं. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. 

मध्यरात्र, घरात दरोडेखोर, रक्तबंबाळ अवस्थेतील वडील अन् ऑटो रिक्षा...; सैफचा मुलगा इब्राहिमने दाखवलं प्रसंगावधान

 

समजून घ्या सगळा घटनाक्रम

- सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास एका आरोपी शिरला. आरोपी ज्या ठिकाणाहून घरात शिरला तिथे घर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रूम होती आणि त्या रूमच्या बाजूला सैफ अली खानच्या मुलांची रूम आहे. आरोपी हा त्या रूमच्या बाजूने जात असताना घरकाम करणाऱ्या महिलेने पाहिलं, त्या महिलेने आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला थांबवलं. यानंतर तिने आरडाओरडा सुरू केली. त्यावेळी आरोपींनी महिलेवर चाकूने हल्ला केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान वरच्या मजल्यावरून खाली आला.

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो अखेर आला समोर, CCTV त झाला कैद

 

सैफ अली खानला पाहताच आरोपीने महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूचा धाक दाखवून एक कोटींची मागणी केली अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपीने महिला लिमा फिलिप्स हिच्यावर चाकूने हल्ला केला. तिच्या हाताला मोठी जखम झाली. त्यानंतर सैफ आला असता त्याच्यावर हल्ला केला. सैफच्या मानेवर, खांद्यावर,पाठीवर आणि हातावर वार केले आणि पायऱ्यांवरून इमारतीबाहेर पळाला.

यानंतर सैफ आली खान आणि जखमी महिला कर्मचारी यांना रिक्षाने लीलावती रुगणालयात उपचारासाठी भरती केले. वांद्रे पोलिसांना याची माहिती मिळतात पोलीस सैफ अली खानच्या घरी रवाना झाले. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More