Sanjay Raut On Annamalai Statement: भाजपचे तमिळनाडुतील नेते अण्णामलाई यांनी मुंबईत भाजपचा प्रचार करताना केलेल्या वक्त्तव्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. आणि हे वक्तव्य करताना त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केलाय. आणि यावरूनच राज्यातील विरोधकांनी भाजप आणि अण्णामलाई यांचा जोरदार समाचार घेतलाय. ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत विरोधकांना आयता मुद्दा अण्णामलाई यांनी दिलाय. एकीकडे विरोधकांनी यावरून भाजपला घेरलं असताना भाजपचे नेते मात्र अण्णामलाई यांचं समर्थन करतना दिसताहेत. मुंबईतील सायनचे भाजप आमदार तमिल सेल्वन अण्णामलाई यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेत. अण्णामलाई काहीही चुकीचं बोलले नाहीत. त्यांच्या वक्तव्यावरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप सेल्वन यांनी केलाय.
भाजप आमदार तमिल सेल्वन यांनी अण्णामलाई यांचं समर्थन केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सेल्वन यांचा समाचार घेतलाय. यावेळी संजय राऊत यांनी तमिल सेल्वन यांना "तुम्ही इंथं काय करता, चेन्नईला निघून जा" असा टोला लगावला आहे. तर संदीप देशपांडे यांनी "चेन्नईला मद्रास म्हटलं तर चालेल का?" असा बोचक सवाल केला आहे. तर अण्णामलाई भाजपचे राष्ट्रीय नेते नाहीत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला अधिक महत्व देण्याची गरज नसल्याचं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय.
अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात मोठं राजकीय वादंग निर्माण झालंय. मराठी अस्मितेचा मुद्दा हातात घेत ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेत. अण्णामलाई यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधुंना आयता मुद्दा मिळालाय. यावरून ठाकरे बंधुंसह दोन्ही पक्षांच्या नेत्यांनाही यावरून भाजपला घेरल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे अण्णामलाई यांच्या वक्तव्याने भाजपच्या नेत्यांची मात्र डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान भाजपचे नेते अण्णामलाई हे मुंबईत भाजपच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी मुंबईचा उच्चार बॉम्बे असा केला. तसेच "मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे" असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य मुळातच महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे होते.
त्यांच्या या वक्तव्याने ऐन निवडणुकीत राजकारण तापले आहे. आणि आता महाराष्ट्राचे नेते असूनही तामिळनाडूच्या नेत्याचे आणि त्याने केलेल्या वक्तव्याचे समर्थन भाजपनेते करत आहेत. यावरून राजकारणात नवा वादंग फुटला आहे.
दरम्यान आता महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत. आज (13 जानेवारी मंगळवार रोजी) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराचे भोंगे थंडावले मात्र, निवडणूक आयोगाने संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनंतर घरोघरी जाऊन फक्त उमेदवारांना प्रचार करण्याची परवानगी दिली आहे.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
NZ
(20 ov) 208/7
|
VS |
USA
201/8(20 ov)
|
| New Zealand beat USA by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 161/6
|
VS |
NEP
162/4(18 ov)
|
| Nepal beat Canada by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 187/7
|
VS |
OMA
188/6(19.2 ov)
|
| Oman beat Zimbabwe by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.