लुंगी नेसल्याने संजय राऊतांचं रवींद्र चव्हाणांवर टीकास्त्र, 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या दाक्षिणात्य लुंगीची सध्या चर्चा रंगली आहे. महायुतीची काल शिवाजी पार्कवर सभा पार पडली. या सभेत रवींद्र चव्हाण यांनी दाक्षिणात्य लुंगी नेसत हजेरी लावली. दरम्यान चव्हाणांच्या याच लुंगीवरून संजय राऊतांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 13, 2026, 09:42 PM IST
लुंगी नेसल्याने संजय राऊतांचं रवींद्र चव्हाणांवर टीकास्त्र, 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेत रवींद्र चव्हाणांनी घातलेल्या लुंगीवरून संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतला आहे. तामिळनाडूचे नेते अण्णामलाईंनी मुंबईत येऊन केलेल्या विधानानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान या वादाची धग सुरू असतानाच रवींद्र चव्हाणांनी दाक्षिणात्य लुंगी नेसत सभेला

Add Zee News as a Preferred Source

हजेरी लावली आणि यानंतर संजय राऊतांनी ट्विट करत रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

राऊतांचं रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र 

रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आले,  म्हणे गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी; मग मोकळा ढाकला मराठी लेंगा घालता आला असता, काय बोलायचं यांना?

एवढंच नव्हे तर रवींद्र चव्हाणांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची सडकून टीका संजय राऊत यांनी केली आहे. सत्तेसाठी रवींद्र चव्हाण वेडे झाले आहेत. असं म्हणत संजय राऊत यांनी अण्णामलाईसह भाजपवर घणाघात साधला. 

'रवींद्र चव्हाणांनी सभेत लुंगी घातली त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे'. "रसमलाई तामिळनाडूतून येतो आणि मराठी माणसांना नाव ठेवतो-राऊत"

संजय राऊतांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपनं देखील राऊतांवर पलटवार केलाय, त्यांची निवडणुकीत पॅन्ट उतरली म्हणून ते लुंगीकडे बघतायत असा खोचक टोला आशिष शेलारांनी लगावला आहे. संजय राऊतांची निवडणुकीतील पॅन्ट उतरली म्हणून ते लुंगीकडे बघतायत' आशिष शेलारांचा राऊतांवर पलटवार.

मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मुंबईवरून चांगलंच राजकारण पेटलं आहे. सत्ताधा-यांचा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच भाजपचे बाहेरील नेते मुंबईत येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणतात. त्यात रवींद्र चव्हाणांनी शिवाजी पार्कातील सभेत लुंगी घातल्यानं राऊतांनी त्यावर आक्षेप घेतला आणि रवींद्र चव्हाणांची चांगलीच खरडपट्टी काढली. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More